Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी यांची भारतीय स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेणारी चित्रफीत पंतप्रधानांनी केली सामाईक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी यांची एक चित्रफीत सामाईक केली असून त्यात ते त्यांच्या पत्नीसह भारतीय स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी यांनी केलेले ट्विट सामाईक करताना पंतप्रधानांनी ट्विट केले:

“ही एक अशी स्पर्धा आहे ज्यात  तुम्हाला पराभूत व्हायला हरकत नाही श्री. राजदूत. तुम्हाला भारतातील पाककलेतील विविधतेचा आनंद घेताना आणि ते अशा नाविन्यपूर्ण पद्धतीने सादर करताना पाहून आनंद झाला.अशाच आणखी चित्रफिती येत राहोत !”