पीएम्इंडिया
वार्षिक परिषदेसाठी 10-12 नोव्हेंबरदरम्यान मी जपानला भेट देत आहे. पंतप्रधान म्हणून जपानला माझी ही दुसरी भेट आहे. जपानबरोबरची आपली भागीदारी ही विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी आहे. बौद्ध वारसा, लोकशाही मूल्ये, खुल्या, समावेशक आणि नियमाधारित जागतिक परिस्थितीसाठी कटिबद्धता या सामाईक दृष्टीकोनातून भारत आणि जपान परस्परांकडे लक्ष देतात. सध्याच्या काळात जपान हा भारतातला सर्वोच्च गुंतवणूकदार देश आहे. मात्र भारतात घरगुती नावे धारण करणाऱ्या अनेक जपानी कंपन्या अनेक दशके भारतीय अर्थव्यवस्थेच्या क्षमता विस्तारण्यासाठी कटिबद्ध आहेत. भारत आणि जपान यांच्यातले व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने टोकियोमधे भारत आणि जपानच्या मोठ्या उद्योगपतींबरोबर मी तपशीलवार चर्चा करणार आहे.
या भेटीत जपानच्या राजांशीही चर्चा करण्याची संधी मला लाभणार आहे. टोकियोमधे 11 नोव्हेंबरला पंतप्रधान शिझो ॲबे यांच्या भेटीदरम्यान भारत-जपान द्विपक्षीय सहकार्याचा व्यापक आढावा घेण्यात येणार आहे.
12 नोव्हेंबरला पंतप्रधान ॲबे यांच्यासमवेत कोबे इथे जाणार असून मुंबई-अहमदाबाद दरम्यान अती वेगवान रेल्वेसाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान जाणून घेता येणार आहे. अती वेगवान रेल्वे तयार करणाऱ्या कोबे इथल्या कावासाकी हेवी इंडस्ट्रीजलाही आम्ही भेट देणार आहोत.
अती वेगवान रेल्वेविषयीचे सहकार्य म्हणजे भारत आणि जपान यांच्यातल्या सहकार्याचे दर्शन घडवणारे तळपते उदाहरण आहे. यामुळे आपल्या व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळण्याबरोबरच भारतात कुशल रोजगार निर्मिती, पायाभूत सोयीसुविधांचा विकास आणि मेक इन इंडिया अभियानाला चालना मिळणार आहे.
M.Desai/S.Tupe/N.Chitale/P.Malandkar
Will go to Japan tomorrow for the Annual Summit, during which I shall hold extensive talks with PM @AbeShinzo. https://t.co/sbA7O3IORQ
— Narendra Modi (@narendramodi) November 9, 2016
There will be interactions with business leaders to boost trade & economic ties. PM Abe & I will also travel to Kobe on the famed Shinkansen
— Narendra Modi (@narendramodi) November 9, 2016