Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जपान आणि रशियाबरोबर रेल्वे क्षेत्रातील विविध करारांबाबत मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील सहकार्य करार आणि सामंजस्य करारांबाबत माहिती देण्यात आली:-

1) 11 डिसेंबर 2015 रोजी रेल्वे मंत्रालय आणि जपानच्या भूमी, पायाभूत, परिवहन आणि पर्यटन मंत्रालय यांच्यात रेल्वे क्षेत्रात तांत्रिक सहकार्याबाबतच्या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या. या कराराअंतर्गत, रेल्वे सुरक्षा, रोलिंग स्टॉक, रेल्वेगाड्यांमध्ये स्वच्छता तंत्रज्ञान, सिग्नल यंत्रणा, दूरसंचार, रेल्वे विद्युतीकरण, रुळ आणि गाडी नियंत्रण प्रणाली आदी बाबींचा समावेश आहे. हा करार तीन वर्षांसाठी वैध असेल. त्यानंतर आपोआप दोन वर्षांसाठी या कराराचे नूतनीकरण होईल.

2) 24 डिसेंबर 2015 रोजी, रेल्वे मंत्रालय आणि “रशियन रेल्वेज” या जॉईंट स्टॉक कंपनीदरम्यान रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या. यामध्ये भारतातील अतिजलद रेल्वे, वेग ताशी 160-200 किमी पर्यंत वाढवण्यासाठी सध्याच्या मार्गांचे आधुनिकीकरण, सुरक्षा प्रणाली, रोलिंग स्टॉक, स्थानक पुनर्विकास, समर्पित मालवाहतूक मार्गिका आदींचा समावेश आहे.

3) 11 डिसेंबर 2015 रोजी, संशोधन संरचना आणि मानक संघटना आणि जपानच्या रेल्वे तांत्रिक संशोधन संस्थेदरम्यान रेल्वे क्षेत्रात तांत्रिक सहकार्याबाबत सामंजस्य करार. या अंतर्गत, रेल्वेगाड्यांच्या परिचालनात सुरक्षा, प्रगत देखभाल तंत्रज्ञान आणि पर्यावरणाला अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर याबाबी समाविष्ट आहेत.

या करारांमुळे भारतीय रेल्वेला संवाद साधण्यासाठी तसेच रेल्वे क्षेत्रातील नवीन घडामोडी आणि ज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या करारांमुळे तांत्रिक तज्ञ, अहवाल, तांत्रिक कागदपत्रे यांचे आदान-प्रदान, प्रशिक्षण, विशिष्ट तंत्रज्ञानावर भर देण्यासाठी चर्चासत्र/कार्यशाळा, माहितीचे आदान-प्रदान शक्य होणार आहे.

S.Kane/I. Jhala/M.Desai