Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जम्मूमधील डोंगराळ प्रदेशातील दहशतवाद प्रभावित विस्थापितांना काश्मीर विस्थापितांप्रमाणेच मदत करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने आज जम्मू संभाग मधील डोंगराळ प्रदेशात दहशतवादाने प्रभावित झालेल्या विस्थापितांना काश्मीरमधील विस्थापितांप्रमाणेच मदत देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याचा वार्षिक खर्च अंदाजे 13.45 कोटी रुपये असेल.

1990 च्या सुरुवातीच्या कालखंडाला जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमुळे काश्मीर खोऱ्यातील अनेक लोकांना नाईलाजास्तव खोरे सोडून जावे लागले होते. खोरे सोडून जाणाऱ्या कुटुंबांव्यतिरिक्त जम्मू संभागच्या विविध डोंगराळ प्रदेशातील लोकांनी देखील सुरक्षेच्या कारणास्तव आसपासच्या सुरक्षित स्थळी स्थलांतर केले होते. सध्या अंदाजे 1054 जम्मू स्थलांतरीत कुटुंबांची नोंदणी आहे.

सध्या जम्मू काश्मीर सरकार प्रति व्यक्ती दरमाह 400 रुपये रोख (कमाल 1600 रुपये दरमाह प्रत्येक कुटूंब) प्रति जनावरासाठी 300 रुपये रोख आणि जम्मूच्या डोंगराळ प्रदेशातील विस्थापितांसाठी चारा खरेदी आणि अन्नधान्यासाठी (9 किलो पीठ, 2 किलो तांदूळ प्रति व्यक्ती दरमाह आणि प्रति कुटूंब 100 लीटर रॉकेल प्रति माह) सहाय्य प्रदान केले जाते. नवीन प्रस्तावामुळे जम्मूमधील डोंगराळ प्रदेशातील विस्थापितांना देखील काश्मीरमधील विस्थापितांप्रमाणेच सहाय्य केले जाईल. जे प्रति व्यक्ती दरमाह 2500 रुपये रोख असतील. यासंदर्भात राज्य सरकारद्वारे झालेल्या खर्चाची भरपाई केंद्र सरकारकडून दिली जाईल.

S.Mhatre/S.Tupe/N.Sapre