पीएम्इंडिया
जम्मू आणि काश्मिरमधील विरोधी पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जम्मू आणि काश्मिर राज्यातील स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आलेल्या या शिष्टमंडळात जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, काँग्रेसचे गुलाम अहमद मीर, पिपल्स डेमोक्रेटीक फ्रन्टचे हकीम महमद, सीपीएमचे एम.वाय.तारीगामी, डेमोक्रेटीक पार्टी नॅशनलीस्ट चे गुलाम हसन मीर यांच्यासह इतरांचा समावेश होता. मोकळ्या वातावरणात ही खुली चर्चा झाली.
राज्यात उद्भवलेल्या स्थितीबद्दल पंतप्रधानांनी सखोल काळजी आणि दु:ख व्यक्त केले. राज्यात अलिकडे झालेल्या घटनांमध्ये प्राण गमावणारे आमचा एक भाग होते, आमच्या देशाचा भाग होते. प्राण गमावणारा युवा असो, सुरक्षा अधिकारी असो अथवा पोलिस असो, त्यामुळे आम्हाला दु:ख झाले आहे. अशा स्थितीत जम्मू आणि काश्मिर राज्याबरोबर आपले सरकार आणि संपूर्ण देश खंबीरपणे उभा आहे, असे त्यांनी सांगितले. ही भावना सर्व राजकीय पक्षांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी असेही पंतप्रधान म्हणाले. राज्य आणि राज्यातील नागरिकांच्या विकासाप्रती आपली वचनबध्दता व्यक्त करताना परिस्थिती लवकरात लवकर सर्वसामान्य व्हावी, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत पंतप्रधानांनी विधायक सूचनांबद्दल कौतुक करत राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी आपले सरकार कटीबध्द असल्याचा पुनरुच्चार केला.
संवाद झालाच पाहिजे, असे आग्रही मत व्यक्त करत संविधानाच्या चौकटीत राहून कायमस्वरुपी आणि निर्णायक तोडगा काढण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. जम्मू आणि कश्मिर राज्यातील समस्या सोडविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित काम करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
BG/MP/VD
Had detailed discussions on the situation in J&K with a delegation of Opposition parties from the state. https://t.co/uVKC6YelTI
— Narendra Modi (@narendramodi) August 22, 2016
I appreciate the constructive suggestions given during today’s meting. All parties must work together to find a solution to J&K’s problems.
— Narendra Modi (@narendramodi) August 22, 2016