पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय क्र. २ धार रोडच्या बांधकामासाठी केंद्रीय विद्यालय संघटनेला संरक्षण विभागाची ७.११८ एकर जमीन ३० वर्षांसाठी वार्षिक 1 रुपया एवढ्या नाममात्र दराने भाडेतत्वावर हस्तांतरित करायला मंजुरी दिली. ३० वर्षांनंतर पुन्हा याचे नूतनीकरण करता येईल.
पार्श्वभूमी
सध्या केंद्रीय विद्यालय क्र. २ धार रोड, उधमपूर येथे एका तात्पुरत्या इमारतीत कार्यरत आहे. होती. सध्या ८५१ मुले या शाळेत शिकत आहेत. केंद्रीय विद्यालयाची कायमस्वरूपी इमारत उभी राहिल्यास जालंधर कॅंटोन्मेंट आणि आसपासच्या परिसरातील मुलांना आवश्यक सुविधांसह योग्य शैक्षणिक वातावरण उपलब्ध होईल.
N.Sapre/S.Kane/P.Kor