Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला तीव्र निषेध


नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. “या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्यायालयाच्या चौकटीत आणले जाईल.त्यांना माफ केले जाणार नाही! त्यांचा कुटील  हेतू कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल”, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :

“जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझ्या सहवेदना व्यक्त करतो. या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत  लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो. या हल्ल्यातील पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.

या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्यायालयाच्या चौकटीत आणले जाईल…त्यांना माफ केले जाणार नाही! त्यांचा कुटील हेतू कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा संकल्प अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल.”

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai