पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीर राज्यासाठी 80 हजार कोटी रुपयांचे विकास पॅकेज जाहीर केले. श्रीनगरमधील शेर ए काश्मीर स्टेडिअममध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काश्मिरीयत, जम्मूरीयत, इन्सानियत या संदेशाची आठवण करुन दिली.
“काश्मिरीयतशिवाय भारत पूर्ण नाही,” असे पंतप्रधानांनी सुफी परंपरचे महत्त्व विशद करताना सांगितले.
जनतेने जम्मूरीयत (लोकशाहीवर) विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी जनतेचे कौतुक केले आणि इन्सानियतवर आधारित जम्मू आणि काश्मीरचा विकास असेल ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की आपले सरकार सबका साथ, सबका विकास यासाठी काम करत आहे आणि म्हणून यासाठी देशाच्या सर्व भागांमध्ये विकास पोहचणे आवश्यक आहे. जम्मू आणि काश्मीरने पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्याची गरज आहे जेव्हा लोक पैसे साठवून जम्मू-काश्मीरला भेट देण्यासाठी येत होते. पर्यटनाशिवाय पश्मिना आणि केशर या क्षेत्रांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
पंतप्रधानांनी गुजरातमध्ये 2001 साली झालेल्या भूकंपानंतर पुनर्रचनेविषयी आपले अनुभव व्यक्त केले. गेल्यावर्षी आलेल्या पूराचा जम्मू आणि काश्मीरला मोठा फटका बसला, परंतु लोकांमध्ये उत्साह (जझ्बा) दिसून येत आहे, असे ते म्हणाले आणि राज्य लवकरच संकटांमधून बाहेर पडेल असा विश्वास दिला. पूरानंतर त्यांनी ताबडतोब कशाप्रकारे राज्याला भेट दिली होती व गेल्यावर्षीची दिवाळी येथेच साजरी केली होती याची त्यांनी याप्रसंगी आठवण केली. तसेच आपल्या आईने जम्मू आणि काश्मीरच्या पूरग्रस्तांसाठी पाच हजार रुपयांची मदत केल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताला विकासापासून रोखणारे कुंद वातावरण गेल्या 17 महिन्यात दूर झाले आहे. भारत आज जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे.
ज्या राज्यातून तरुण क्रिकेटपटू परवेज रसूल येतो, त्या राज्यात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने झाले पाहिजेत. राज्यात तयार होणाऱ्या बॅट प्रमुख भारतीय क्रिकेटपटू वापरत असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग उपस्थित होते.
S. Thakur/S.Tupe/N.Sapre
I have got the privilege to visit Jammu and Kashmir so often. This land draws me here: PM @narendramodi https://t.co/v0l1RVO9uZ
— PMO India (@PMOIndia) November 7, 2015
When this land experienced pain, I would also experience pain & I came here, we worked with the then state government: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 7, 2015
When this land experienced pain, I would also experience pain & I came here, we worked with the then state government: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 7, 2015
All parts of India must develop. Every citizen of India's support & every part's progress is required: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 7, 2015
At the public meeting at Sher E Kashmir Stadium reiterated the message that India is incomplete without Kashmiriyat. https://t.co/jWcby9yzRj
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2015
The package for J&K announced today will give a boost to all-round development of the state & give wings to the aspirations of the youth.
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2015
Guided by Mantra of 'Sabka Saath, Sabka Vikas' our Govt. is ensuring that the fruits of progress reach every person in every part of India.
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2015
Development projects that will contribute to the progress of J&K & the nation. pic.twitter.com/aymQlTvAjF
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2015
There is something special about J&K that draws me there so often. Always a delight to visit & my gratitude to the people for the warmth.
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2015