Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघाने रणजी ट्रॉफी पहिल्यांदा जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2026

 

जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघाने रणजी ट्रॉफी पहिल्यांदा जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

हा ऐतिहासिक विजय संघाची उल्लेखनीय जिद्द, शिस्त आणि उत्साहाचे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या लोकांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे, हे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की हा विजय या प्रदेशातील वाढते क्रीडाप्रेम आणि प्रतिभेला अधोरेखित करेल.

या यशामुळे अनेक तरुण खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि अधिक खेळण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे;

“जम्मू आणि काश्मीर संघाचे त्यांच्या पहिल्या रणजी चषक विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन! हा ऐतिहासिक विजय संघाची उल्लेखनीय जिद्द, शिस्त आणि उत्कटतेचे प्रतीक आहे. हा जम्मू आणि काश्मीरच्या जनतेसाठी अभिमानाचा क्षण आहे, तसेच तेथील वाढते क्रीडाप्रेम आणि प्रतिभा अधोरेखित करतो. या विजयामुळे अनेक तरुण खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि अधिक खेळण्याची प्रेरणा मिळो.”

 

* * *

माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai