पीएम्इंडिया
जल संसाधन मंत्रालयाच्या अंतर्गत असणा-या फराक्का धरण प्रकल्पातील 14.86 हेक्टर जमीन नौवहन मंत्रालयाच्या अंतर्गत असणा-या इनलँड कॉटरवेज ऑफ इंडियाकडे (IWAI) हस्तांतरीत करायला केंद्रीय मंत्रीमंडळाने 6 जानेवारी रोजी मान्यता दिली. फराक्का इथं सध्या असलेल्या नौवहन दरवाजाला समांतर नवीन दरवाजा बांधला जाईल.
या प्रकल्पाचा 2.35 कोटी रुपयांचा खर्चIWAI उचलणार आहे. नौवहन दरवाज्याचे बांधकाम, जल मार्ग विकास प्रकल्पाअंतर्गत होणार आहे. या नव्या दरवाज्यामुळे राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 वर नौकांची वाहतूक सुलभ आणि विना अडथळा होईल.
सध्या वापरात असलेल्या नौवहन दरवाजातून प्रवास करण्यासाठी नौकांना बराच वेळ लागतो.
नवीन नौवहन दरवाजाच्या बांधकामाबाबतची सविस्तर शक्यता पडताळून पाहण्यासाठी तसच फराक्का इथल्या सध्याच्या नौवहन दरवाज्याच्या अत्याधुनिकरणाबाबत राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 वरील नौवहन सुरळीत व्हावे यासाठी नौवहन मंत्रालय – जलमार्ग मंत्रालय, यांच्याशी चर्चा करेल.
भारत आणि बांगलादेश दरम्यान 1996 मध्ये झालेल्या गंगा पाणी वाटप करारानुसार फराक्का इथं गंगेच्या पाणी वाटपाबाबत असलेल्या सध्याच्या व्यवस्थेवर परिणाम न करता हे काम हाती घेण्यात येईल.
राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 वर गंगा-भागिरथी-हुगळी नदी व्यवस्थेतील अलाहाबाद हल्दीया मार्गावरील नौवहनाची क्षमता वाढावी, यासाठी जागतिक बँकेच्या तंत्रज्ञान आणि गुंतवणूक पाठींब्याने IWAI हा प्रकल्प राबवत आहे.
J. Patankar/ S. Tupe/ M. Desai