पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय आणि नेदरलँड्सच्या पर्यावरण विभागादरम्यान जल स्रोतांच्या व्यवस्थापन क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्यासाठी सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.
उभय सरकारांनी अभ्यास दौरे, चर्चासत्र, परिषदा आणि बैठकांचे आयोजन करून जलसंपदा क्षेत्रातील अनुभवांचे आदान-प्रदान करून राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य वाढवण्यासाठी काम करावे हा या कराराचा उद्देश आहे.
या कराराच्या अंमलबजावणी दरम्यान हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमांवर देखरेख ठेवण्यासाठी संयुक्त कृती गट स्थापन केला जाणार आहे.
या द्विपक्षीय सहकार्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांची संस्थात्मक आणि तांत्रिक क्षमता वाढण्यास मदत होईल.
B.Gokhale/S.Kane/Anagha