Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक रेडिओ दिन हा लोकांसाठी एका विश्वासार्ह आवाजाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे: पंतप्रधान


 

जागतिक रेडिओ दिन म्हणजे अशा एका माध्यमाचा उत्सव साजरा करणे आहे जे लोकांसाठी एक विश्वासार्ह आवाज आहे, मग ते दुर्गम गाव  असो किंवा गजबजलेले शहर,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे   रेडिओने वर्षानुवर्षे वेळेवर माहिती दिली आहे, प्रतिभेला चालना दिली आहे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले आहे,असे मोदी यांनी पुढे नमूद केले.

“मन की बातच्या माध्यमातून,  लोकांमधील सामाजिक ताकद जाणून घेण्याची रेडिओची क्षमता मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. या महिन्याचा कार्यक्रम रविवार, 22 फेब्रुवारी रोजी होईल. या कार्यक्रमासाठी आपली  मते मला  नक्की कळवा”, असे आवाहन मोदी यांनी केले आहे .

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे :

“जागतिक रेडिओ दिन म्हणजे अशा एका माध्यमाचा उत्सव साजरा करणे आहे जे लोकांसाठी एक विश्वासार्ह आवाज आहे, मग ते दुर्गम गाव  असो किंवा गजबजलेले शहर! वर्षानुवर्षे, रेडिओने वेळेवर माहिती दिली आहे, प्रतिभेला चालना दिली आहे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले आहे. या माध्यमाशी संबंधित सर्वांच्या प्रयत्नांना मान्यता देण्याचा हा दिवस आहे.”

मन की बात द्वारे, मी लोकांमधील सामाजिक ताकद जाणून घेण्याची रेडिओची क्षमता मी प्रत्यक्ष अनुभवली आहे.  या महिन्यात हा कार्यक्रम रविवार, 22 फेब्रुवारी रोजी होईल.  कार्यक्रमासाठी आपल्या सूचना सामायिक करा.”

https://mygov.in/group-issue/inviting-ideas-mann-ki-baat-prime-minister-narendra-modi-22nd-february-2026/?target=inapp&type=group_issue&nid=366266

***

नेहा कुलकर्णी / संपदा पाटगावकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai