पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 3 मार्च 2026
जागतिक वन्यजीव दिन आपल्या पृथ्वीला समृद्ध करणाऱ्या आणि परिसंस्थांना आधार देणाऱ्या अनमोल प्राणिजातीय वैविध्याचा उत्सव असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. वन्यजीव रक्षणासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येकाच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे.वन्यजीवन समृद्धपणे नांदत राहावे यासाठी, संवर्धन, शाश्वत पद्धती आणि अधिवासांचे संरक्षण करण्याबाबत आपल्या वचनबद्धतेची आम्ही पुष्टी करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
भारत जगातील काही सर्वात असामान्य वन्यजीवांचे निवासस्थान असल्याचा आम्हाला आनंद असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. जगातील वाघांच्या एकूण लोकसंख्येपैकी 70%टक्क्यांहून अधिक वाघ भारतात आढळतात. तसेच,एकशिंगी गेंड्यांची सर्वाधिक संख्या आणि आशियाई हत्तींची सर्वाधिक संख्यादेखील भारतात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याशिवाय दिमाखदार आशियाई सिंहांचा नैसर्गिक अधिवास जगात केवळ भारतातच असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारने वन्यजीव संरक्षणासाठी अनेक प्रयत्न हाती घेतले असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यामध्ये इतर राष्ट्रांसोबत सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी एक विशेष मंच म्हणून आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची स्थापना समाविष्ट आहे. इतर प्रयत्नांमध्ये माळढोक, सुसर आणि अस्वलाचे संरक्षण तसेच चित्त्यांचे पुनर्वसन या उपक्रमांचा समावेश आहे.
भारताच्या सांस्कृतिक मूल्यांवर भर देत पंतप्रधानांनी म्हटले आहे की, आपल्या शास्त्रांमध्ये सर्व सजीवांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. त्यातून वन्यजीवांच्या संरक्षणासोबतच वन्यजीवांबद्दल संवेदनशील असण्याची प्रेरणाही मिळते. त्यांनी यासंदर्भात एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
“निर्वनो वध्यते व्याघ्रो निर्व्याघ्रं छिद्यते वनम्। तस्माद् व्याघ्रो वनं रक्षेद् वनं व्याघ्रं च पालयेत्॥”
हे सुभाषित सांगते की, वनांशिवाय वाघ जगू शकत नाहीत आणि वाघांशिवाय वने नष्ट होतात.त्यामुळे वाघ वनांचे संरक्षण करतो आणि जंगल वाघांचे रक्षण करते. निसर्गात खोलवर रुजलेले आंतरावलंबित्व यातून व्यक्त होते.
पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरील मालिकेत म्हटले आहे :
“जागतिक वन्यजीव दिन आपल्या पृथ्वीला समृद्ध करणाऱ्या आणि परिसंस्थांना आधार देणाऱ्या अनमोल प्राणिजातीय वैविध्याचा उत्सव आहे. वन्यजीव रक्षणासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येकाच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याचा दिवस आहे. आपले वन्यजीवन समृद्धपणे नांदत राहावे यासाठी, संवर्धन, शाश्वत पद्धती आणि अधिवासांचे संरक्षण करण्याबाबत आपल्या वचनबद्धतेची आम्ही पुष्टी करतो.”
“आपला भारत काही असामान्य वन्यजीवांचे निवासस्थान असल्याचा आम्हाला आनंद आहे. जगातील वाघांच्या एकूण लोकसंख्येपैकी 70% टक्क्यांहून अधिक वाघ भारतात आढळतात. तसेच, एकशिंगी गेंड्यांची सर्वाधिक संख्या आणि आशियाई हत्तींची सर्वाधिक संख्यादेखील भारतात आहे. याशिवाय दिमाखदार आशियाई सिंहांचा नैसर्गिक अधिवास जगात केवळ भारतातच आहे.”
“रालोआ सरकारने वन्यजीव संरक्षणासाठी अनेक प्रयत्न हाती घेतले आहेत.यामध्ये इतर राष्ट्रांसोबत सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी एक विशेष मंच म्हणून आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची स्थापना समाविष्ट आहे. इतर प्रयत्नांमध्ये माळढोक, सुसर आणि अस्वलाचे संरक्षण तसेच चित्त्यांचे पुनर्वसन या उपक्रमांचा समावेश आहे.”
World Wildlife Day is about celebrating the incredible faunal diversity that enriches our planet and sustains our ecosystems. It is a day to acknowledge everyone working towards wildlife protection. We reaffirm our commitment to conservation, sustainable practices and protecting… pic.twitter.com/eR20kbPWNO
— Narendra Modi (@narendramodi) March 3, 2026
“आज जागतिक वन्यजीव दिन आहे. आपल्या शास्त्रांमध्ये सर्व सजीवांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. त्यातून वन्यजीवांच्या संरक्षणासोबतच वन्यजीवांबद्दल संवेदनशील असण्याची प्रेरणाही मिळते. त्याचे एक उदाहरण हे आहे …
निर्वनो वध्यते व्याघ्रो निर्व्याघ्रं छिद्यते वनम्।
तस्माद् व्याघ्रो वनं रक्षेद् वनं व्याघ्रं च पालयेत्॥”
आज World Wildlife Day है। हमारे शास्त्रों में सभी जीवों के कल्याण की कामना की गई है। उनसे हमें वन्यजीवों के संरक्षण के साथ-साथ उनके प्रति संवेदनशील होने की प्रेरणा भी मिलती है। उसका एक उदाहरण यह है…
निर्वनो वध्यते व्याघ्रो निर्व्याघ्रं छिद्यते वनम्।
तस्माद् व्याघ्रो वनं… pic.twitter.com/Ov21JPYqR1
— Narendra Modi (@narendramodi) March 3, 2026
अंबादास यादव/सोनाली कुलकर्णी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
आज World Wildlife Day है। हमारे शास्त्रों में सभी जीवों के कल्याण की कामना की गई है। उनसे हमें वन्यजीवों के संरक्षण के साथ-साथ उनके प्रति संवेदनशील होने की प्रेरणा भी मिलती है। उसका एक उदाहरण यह है…
— Narendra Modi (@narendramodi) March 3, 2026
निर्वनो वध्यते व्याघ्रो निर्व्याघ्रं छिद्यते वनम्।
तस्माद् व्याघ्रो वनं… pic.twitter.com/Ov21JPYqR1
World Wildlife Day is about celebrating the incredible faunal diversity that enriches our planet and sustains our ecosystems. It is a day to acknowledge everyone working towards wildlife protection. We reaffirm our commitment to conservation, sustainable practices and protecting… pic.twitter.com/eR20kbPWNO
— Narendra Modi (@narendramodi) March 3, 2026
We in India cherish the fact that we are home to some of the world’s most extraordinary wildlife. We are home to over 70% of the world’s tiger population. We have the largest population of the one-horned rhino, the maximum Asiatic elephants. India is the only place in the world… pic.twitter.com/cqA6bf5KOV
— Narendra Modi (@narendramodi) March 3, 2026
The NDA Government has undertaken numerous efforts for wildlife protection. This includes the setting up of the International Big Cat Alliance, an exceptional forum to share best practices with fellow nations. Other efforts include those aimed at protecting the Great Indian…
— Narendra Modi (@narendramodi) March 3, 2026