पीएम्इंडिया
फ्लाईट लेफ्टनंट मुआथ अल कसासबेह यांच्या निर्घृण हत्येचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यासंबंधीचा संदेश जॉर्डनचे राजे अब्दुल्लाह द्वितीय इब्न-अल-हुसैन यांना पंतप्रधान मोदी यांनी पत्र लिहून पाठवला आहे.
“फ्लाईट लेफ्टनंट मुआथ अल कसासबेह यांच्या निर्घृण हत्येचे वृत्त समजल्यानंतर आपल्याला तीव्र धक्का बसला आणि दु:ख झाले.
दहशतवाद हे एक आव्हान असल्याची आठवण या घटनेमुळे होते आणि दहशतवादाविरोधात आवाज उठविण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत.
आम्ही या भ्याड आणि अविचारी हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहोत. अशा दु:खाच्या काळात भारत जॉर्डन सरकारच्या पाठीशी आणि मृत्यू पावलेल्या शूर फ्लाईट लेफ्टनंटच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठाम उभा आहे”, असे पंतप्रधानांनी आपल्या पत्रात म्हटले आहे