Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ज्ञान, कौशल्ये आणि आरोग्यावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. ज्ञान आत्मसात करून, त्याचा अंगिकार करत, नवनवीन कौशल्ये विकसित करून, आणि उत्तम आरोग्याला प्राधान्य देत देशातील युवा पिढी भारताचे भविष्य घडवण्यात एक प्रभावी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचे यात पंतप्रधानांनी नमूद केले. हे गुण केवळ व्यक्तींनाच सक्षम करत नाहीत, तर, राष्ट्रउभारणीतही महत्वाचे योगदान देतात.

 पंतप्रधानांनी पुढील संस्कृत श्लोक सामायिक केला.  

“धन्यानामुत्तमं दाक्ष्यं धनानामुत्तमं श्रुतम्।

लाभानां श्रेय आरोग्यं सुखानां तुष्टिरुत्तमा।।”

(X) ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणतात :

“शिक्षणातून विवेक, कौशल्यातून विकास आणि उत्तम आरोग्याच्या माध्यमातून प्रत्येक संकल्प साध्य होतो. आज आपले तरुण याच गुणांना आत्मसात करून देशाला नवी ओळख देत त्याला अधिक सशक्त बनवत आहेत.”

धन्यानामुत्तमं दाक्ष्यं धनानामुत्तमं श्रुतम्।

लाभानां श्रेय आरोग्यं सुखानां तुष्टिरुत्तमा।।

***

AshishSangle / SavitaMhaskar / DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai