पीएम्इंडिया
ज्येष्ठ अभिनेते सलीम कुमार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र दुःख व्यक्त केले. सलीम कुमार यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत वैविध्यपूर्ण भूमिका आणि संस्मरणीय अभिनयाच्या जोरावर एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली होती, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या कठीण प्रसंगी सलीम कुमार यांचे कुटुंबीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हणले आहे.
‘X’ वरील पोस्ट मध्ये पंतप्रधान लिहितात,
“ज्येष्ठ अभिनेते सलीम कुमार यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. संस्मरणीय अभिनयाच्या जोरावर त्यांनी आपली एक वेगळी छाप सोडली. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबाच्या आणि असंख्य चाहत्यांच्या पाठीशी आहेत. ॐ शांती.”
Deeply saddened by the passing of veteran actor Shri Salim Kumar Ji. Over the course of a distinguished career, he made a mark with his versatility and memorable performances across a wide range of roles. My thoughts are with his family and countless admirers in this hour of…
— Narendra Modi (@narendramodi) June 7, 2026
***
नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
Deeply saddened by the passing of veteran actor Shri Salim Kumar Ji. Over the course of a distinguished career, he made a mark with his versatility and memorable performances across a wide range of roles. My thoughts are with his family and countless admirers in this hour of…
— Narendra Modi (@narendramodi) June 7, 2026
പ്രമുഖ നടൻ ശ്രീ സലിം കുമാർ ജിയുടെ വിയോഗത്തിൽ അഗാധമായ ദുഃഖം രേഖപ്പെടുത്തുന്നു. വിശിഷ്ടമായ അഭിനയ ജീവിതത്തിൽ വൈവിധ്യമാർന്ന കഥാപാത്രങ്ങളിലൂടെയും അവിസ്മരണീയമായ പ്രകടനങ്ങളിലൂടെയും അദ്ദേഹം തന്റേതായ വ്യക്തിമുദ്ര പതിപ്പിച്ചു.ദുഃഖത്തിന്റെ ഈ വേളയിൽ എന്റെ ചിന്തകൾ അദ്ദേഹത്തിന്റെ കുടുംബത്തോടും…
— Narendra Modi (@narendramodi) June 7, 2026