पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने टपाल क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि जपान यांच्यातील सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. या करारामुळे उभय देशांदरम्यान, टपाल सेवेत सुधारणा होईल तसेच सहकार्य वाढीस लागेल.
लाभ :
या करारामुळे भारत आणि जपान यांच्यात टपाल सेवा सुधारेल आणि सहकार्य वाढेल.
टपाल धोरणासंदर्भात, दोन्ही देश आपल्या अनुभवांच्या आधारे माहितीची देवाणघेवाण करतील
सहयोगी संबंध प्रस्थापित करण्यासाठी चर्चेला प्रोत्साहन
परस्पर हिताच्या विशिष्ट क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी टपाल सेवा संवादाची स्थापना
B.Gokhale/S.Kane/P.Kor