Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

टांझानिया दौऱ्यादरम्यान भोजनसमयी पंतप्रधानांनी केलेले भाषण १०.०७.२०१६

टांझानिया दौऱ्यादरम्यान भोजनसमयी पंतप्रधानांनी केलेले भाषण

१०.०७.२०१६


माननीय राष्ट्रपती मागुफुली,

विशेष अतिथी यांस,

मन:पूर्वक आभार. आपल्या औदार्यपूर्ण शब्दासाठर, औदार्यपूर्ण आतिथ्यासाठी आणि ज्या आपुलकीने आपण माझे आणि माझ्या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत केले आहे, त्याबद्दल आपले अनेक आभार.

आज रविवारचा दिवस असतानाही आपण माझ्यासाठी वेळ काढलात, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे.

मित्रहो,

शांततेचा निवास असणाऱ्या या दारसलाम नावाच्या ओजस्वी शहरातील वास्तव्याचा मला मनापासून आनंद झाला आहे.

मला सांगण्यात आले की स्वाहिली भाषेत एक म्हण आहे, “हेरी याको हे – री यांगू” अर्थात तुमच्या आनंदातच माझा आनंद सामावलेला आहे.

याच भावनेसह मी आज टांझानियामध्ये आलो आहे. आपल्या दोन्ही देशांमधील संबंधांची मूळे फार सखोल आणि खोलवर रूजलेली आहेत. शतकानुशतके आपले नागरिक परस्परांना ओळखतात. हिंदी महासागराचे जल आपल्याला जोडते. आपल्या दोन्ही देशांना सुदृढ सागरी परंपरा लाभली आहे.

शतकानुशतके आम्ही हिंदी महासागराच्या जलापलिकडे व्यापार करण्यासाठी अनुकुल हवेचा वापर केला आहे. आज आम्ही एका आंतर्निर्भर विश्वासाबद्दल बोलतो आहोत. फार पूर्वी अठराव्या शतकात गुजरातचे मांडवी बंदर आणि झांजीबार बंदर ही दोन्ही आंतरनिर्भर बंदरे होती. स्वाहिली नौकांच्या प्रतिक्षेत असणाऱ्या गुजरातमधील मांडवी बंदरातील व्यापाऱ्यांचे वर्णन, साहित्यामध्ये लिहिले गेले आहे.

आपल्या या महान देशात पहिले पाऊल टाकणारे अनिवासी भारतीय हे माझ्याच राज्यातून आले होते. आज घडीला टांझानियामधील भारतीय वंशाचा समाज हा व्यापार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात आमच्या लोकांना जोडणारा एक महत्वपूर्ण दुवा आहे.

अलिकडच्या दशकांमध्ये राष्ट्रपती न्येरेरे यांच्या काळापासूनच आमच्या नागरिकांच्या प्रगती आणि समृद्धीसाठी आमची समान मूल्ये, समान संघर्ष आणि दृढ इच्छेने आमच्या संबंधांना वेगळे परिमाण दिले आहे.

मित्रहो,

गेल्या काही वर्षांमध्ये वाणिज्य क्षेत्रात आमचे संबंध, व्यापार आणि गुंतवणुकीतील आमचा सहभाग आणि विकास बहरला आहे. आज भारत देश जगातील सर्वात जास्त वेगाने वाढती अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो आहे, त्याच प्रकारे टांझानिया या देशाचा समावेश या महाद्वीपावरील सर्वात महत्वपूर्ण अर्थव्यवस्थांमध्ये होतो, असे म्हणता येईल. राष्ट्रपती मागुफुली यांच्याबरोबर आज मी केलेल्या सविस्तर चर्चेने आमच्या भागिदारीच्या या संपूर्ण परीघाला स्पर्श केला आहे.

सहकार्याचा आमचा व्यापक कार्यक्रम, विकासासाठीचा आमचा प्राधान्यक्रम आणि सुरक्षेबाबतच्या आमच्या समान आवश्यकतांनी प्रेरित आहे. या चर्चेच्या आधारशिलेवरच आम्ही एकविसाव्या शतकातील भागिदारीची निर्मिती करणार आहोत.

मित्रहो,

टांझानियाच्या विकासाच्या प्रवासात भारत नेहमीच एक विश्वसनीय सहकारी राहीला आहे आणि यापुढेही राहील.

आणि ज्याप्रकारे आपण –

• आपल्या कृषि क्षेत्राचे आधुनिकीकरण करीत आहात;

• आपल्या शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेचा विस्तार करीत आहात; तसेच

• आपल्या अर्थव्यवस्थेचे औद्योगिकरण करीत आहात;

• आपल्या युवकोंना कुशल बनवित आहात;

• आपल्या क्षमता आणि संस्थांचे निर्माण करीत आहात;

• आपल्या नागरिकांना आणि समाजाला सुरक्षित करीत आहात;

आपणास भारतात निश्चितच एक विश्वसनीय मित्र भेटू शकेल.

आपल्या गरजा आणि प्राधान्यक्रम लक्षात घेत, मित्रत्वाच्या नात्याने आम्ही टांझानियाला आमचे अनुभव, आमची कौशल्ये, आमच्या क्षमता आणि आमचे तंत्रज्ञान देण्यास तयार आहोत.

मित्रहो,

या ठिकाणी मी विनंती करतो की या सदिच्छा व्यक्त करताना आपणही मला साथ द्या:

• आदरणीय राष्ट्रपती जॉन मागुफुली यांचे आरोग्य आणि यशस्वितेसाठी;

• टांझानियाचे संयुक्त प्रजासत्ताक असणाऱ्या या महान देशातील मैत्रिपूर्ण आणि आतिथ्यशील नागरिकांच्या प्रगती आणि समृद्धीसाठी; तसेच

• भारत आणि टांझानिया यांच्यातील निरंतर मैत्री आणि भागिदारीसाठी.

BG/MP/AK