Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

टेक्सासच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट


भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेतल्या टेक्सास राज्याचे राज्यपाल ग्रेग ॲबॉट यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

भारत आणि अमेरिकेतल्या भागीदारीत मोठी वाढ होत असून टेक्सासबरोबर व्यापार उदीम, ऊर्जा, उद्योग, शिक्षण आणि नागरिकांमधले संबंध या क्षेत्रातल्या वाढत्या दुव्यांचे महत्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

टेक्सासमध्ये राहणारे भारतीय वंशाचे नागरिक टेक्सास आणि अमेरिकेसाठी देत असलेल्या योगदानाबद्दल राज्यपाल ॲबॉट यांनी कौतुक केले.

B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar