Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डिजिटल इंडिया उपक्रमाने 11 वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला; ते म्हणाले की या उपक्रमाने प्रशासनाचा कायापालट केला, नागरिकांना सक्षम केले आणि विकसित भारताचा पाया बळकट केला


नवी दिल्‍ली, 1 जुलै 2026

 

प्रशासन, सार्वजनिक सेवा वितरण आणि नागरिकांच्या जीवनावर परिवर्तनशील प्रभाव पाडणाऱ्या डिजिटल इंडिया उपक्रमाने 11 वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आनंद व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की डिजिटल इंडिया उपक्रमाने प्रशासनाला अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिक-केंद्रित स्वरूप देण्यासोबतच संपूर्ण देशभरातील सर्वांगीण विकासाला गती दिली. तंत्रज्ञानाला “जीवनमानातील सुलभतेत” वाढ करण्यासाठीचे शक्तिशाली साधन बनवत, या उपक्रमाने सुरळीत डिजिटल भरणा आणि पारदर्शक थेट लाभ हस्तांतरणापासून डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विस्तारापर्यंत जीवनाच्या हरेक पैलूला स्पर्श केला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

एक अब्जाहून अधिक भारतीयांनी केलेल्या तंत्रज्ञानाच्या व्यापक स्वीकारामुळे परिवर्तनकारी बदल घडून आला असून डिजिटल इंडिया उपक्रम विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठीचा मजबूत पाया ठरला आहे असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. मोदी पुढे म्हणाले की, डिजिटल इंडिया ने देशाच्या कानाकोपऱ्यात, विशेषतः गावे आणि दुसऱ्या, तिसऱ्या स्तरावरील शहरांमध्ये नवोन्मेषाची लाट पोहोचवली आहे. ते म्हणाले की, देशभरातील तरुण उद्योजक, स्टार्ट अप्स आणि नवोन्मेषकर्ते जगासमोर उभ्या राहिलेल्या काही अत्यंत गंभीर आव्हानांचा सामना करण्याचे उपाय विकसित करत आहेत. या उपक्रमाने शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी, वाणिज्य आणि सार्वजनिक सेवा वितरण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना बळकटी देऊन प्रशासनाला अधिक सुलभतेने उपलब्ध, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवले आहे असे त्यांनी नमूद केले.

उदयोन्मुख तंत्रज्ञानांमध्ये भारताची वाढती आघाडी अधोरेखित करत मोदी म्हणाले की कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), सेमिकंडक्टर आणि क्वांटम कम्प्युटिंग यांसारख्या क्षेत्रात देशाने केलेली प्रगती विकास आणि संधींचे नवे मार्ग खुले करेल. जेथे तंत्रज्ञान मानवतेच्या सेवेसाठी वापरले जाईल, प्रत्येक नागरिकाला सक्षम करेल आणि शाश्वत विकासाला चालना देईल असे भविष्य उभारण्याप्रती सरकारच्या बांधिलकीची मोदी यांनी ग्वाही दिली.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान लिहितात:

डिजिटल इंडिया उपक्रमाची सुरुवात होऊन आज 11 वर्षे पूर्ण होत आहेत. या उपक्रमाने प्रशासनाची नव्याने व्याख्या केली, नागरिकांना सक्षम केले आणि सर्वांगीण विकासाला गती दिली. या उपक्रमाने जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला आहे. सुरळीत डिजिटल भरणा आणि थेट लाभ हस्तांतरण पारदर्शक पद्धतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यापासून डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विस्तारापर्यंत सर्वत्र तंत्रज्ञान “जीवनमानातील सुलभते”त वाढ करण्यासाठीचे शक्तिशाली साधन बनले आहे.

डिजिटल इंडिया उपक्रमाने देशाच्या कानाकोपऱ्यात, विशेषतः गावे आणि दुसऱ्या,तिसऱ्या स्तरावरील शहरांमध्ये नवोन्मेषाची लाट पोहोचवली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुण उद्योजक, स्टार्ट अप्स आणि नवोन्मेषकर्ते आपल्या विश्वासमोर उभ्या राहिलेल्या अत्यंत गंभीर आव्हानांचा सामना करण्याचे उपाय विकसित करत आहेत. या उपक्रमाने शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी, वाणिज्य आणि सार्वजनिक सेवा वितरण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना बळकटी देऊन प्रशासनाला अधिक पारदर्शक कार्यक्षम आणि सुलभतेने उपलब्ध होणारे बनवले आहे.

डिजिटल विश्वात आपण घेतलेल्या भरारीमुळे एआय, सेमिकंडक्टर्स, क्वांटम कम्प्युटिंग आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये भारत वेगाने प्रगती करेल याची खात्री झाली आहे. यातून विकास आणि संधींचे नवे मार्ग देखील खुले होतील. तंत्रज्ञान मानवतेच्या सेवेसाठी वापरले जाईल, प्रत्येक नागरिकाला सक्षम करेल आणि शाश्वत विकासाला चालना देईल असे भविष्य उभारण्यावर आमचे लक्ष सतत केंद्रित असेल.

 

जेव्हा एका अब्जाहून अधिक भारतीय तंत्रज्ञानाचा स्वीकार करतात तेव्हा होणारा बदल परिवर्तनकारी असतो!

#11YearsOfDigitalIndia

 

डिजिटल इंडिया उपक्रम विकसित आणि आत्मनिर्भर भारताचा मजबूत पाया आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये या उपक्रमाने गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका निभावण्यासोबतच देशवासीयांचे जीवन सुखकर बनवले आहे. ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या विस्तारापासून डिजिटल व्यवहारांपर्यंत प्रत्येक ठिकाणी या अभियानाने अभूतपूर्व यशासह संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधून घेतले आहे.

#11YearsOfDigitalIndia

 

* * *

नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai