पीएम्इंडिया
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोखरहित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी निती आयोगाने काही योजना जाहीर केल्या होत्या. लकी ग्राहक योजना आणि डिजि-धन व्यापार योजना या दोन योजनांची घोषणा 25 डिसेंबर 2016 ला करण्यात आली होती. या योजनेत सहभागी झालेल्या 14 लाख लोकांना तसेच 77,000 व्यापाऱ्यांना मोठी बक्षिसे मिळाली आहेत.
आतापर्यंत 226,45,40,000 रुपयांची बक्षिसे भाग्यवान विजेत्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. यात विविध वयोगटाच्या स्त्री-पुरुषांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातल्या सुनिल चव्हाण या युवा शेतकऱ्यालाही या योजनेंतर्गंत बक्षिस मिळाले आहे. डिजिटल व्यवहारांमुळे त्याच्या दुधाच्या व्यवसायातले दलाल बंद होऊन त्याला अधिक आणि थेट नफा मिळतो, अशी प्रतिक्रिया सुनिल चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
स्वत:चे दुकान चालवणाऱ्या नाहीदलाही या योजनेंतर्गंत बक्षिसे मिळाले आहे. तिने दुकानात डिजिटल व्यवहारांसाठीची उपकरणे लावून घेतली असून 80 टक्के व्यवहार त्याच्या मदतीने दिले जातात.
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी 100 दिवसात देशातल्या 100 शहरांमध्ये डिजि धन मेळावे भरविण्यात येत आहेत. याअंतर्गंत 5000 वित्तीय संस्था 15 लाख लोकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाल्या असून आतापर्यंत 16,000 शासकीय आणि खाजगी संस्था रोखरहित व्यवहारांकडे वळल्याचे दिसून येत आहेत. येत्या 14 एप्रिलला या मेळाव्याची सांगता होणार असून त्यादिवशी मेगा लॉटरी काढली जाईल.