पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 3 जून 2026
मेटे फ्रेडरिक्सन यांची डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.भारत आणि डेन्मार्क यांच्यात परस्पर विश्वास, सामायिक मूल्ये आणि शाश्वत भविष्यासाठी असलेल्या समान वचनबद्धतेवर आधारित एक मजबूत व दीर्घकालीन भागीदारी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी आणि दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणासाठी हे सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी आपण पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
‘X’ वरील पोस्ट मध्ये पंतप्रधान लिहितात,
“मेटे फ्रेडरिक्सन यांचे डेन्मार्कच्या पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक कार्यकाळ स्वीकारल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
भारत आणि डेन्मार्क यांच्यात परस्पर विश्वास, सामायिक मूल्ये आणि शाश्वत भविष्यासाठी असलेल्या समान कटिबद्धतेवर आधारलेली एक अभेद्य भागीदारी आहे. भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी आणि आमच्या जनतेच्या फायद्यासाठी आपले सहकार्य नव्या उंचीवर नेण्याकरिता मी पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांच्यासोबत एकत्र काम करण्यास अतिशय उत्सुक आहे.
@Statsmin”
Congratulations to my friend Ms. Mette Frederiksen on assuming office as the Prime Minister of Denmark for a remarkable third consecutive term.
India and Denmark share an enduring partnership founded on mutual trust, shared values and a common commitment to a sustainable future.…
— Narendra Modi (@narendramodi) June 3, 2026
राधिका अघोर/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com