Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार


माजी राष्ट्रपती भारतरत्‍न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त डीआरडीओ भवन येथे 15 ऑक्टोबर 2015 रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी पंतप्रधान डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे अनावरण करतील. त्याचबरोबर “डॉ. कलाम जीवनोत्सव” या छायाचित्र प्रदर्शनाचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. डीआरडीओ भवनातील कोठारी सभागृहात आयोजित सभेलाही पंतप्रधान संबोधित करणार आहेत.

S.Tupe/N.Sapre