पीएम्इंडिया
देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली व्यक्त केली आहे.
“महात्मा गांधी यांच्या कार्यातून प्रेरणा घेत डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. असहकार चळवळीसारख्या तळागाळातल्या चळवळींमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी खंबीर नेतृत्व दिले होते.
देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन देशाच्या सुरुवातीच्या काळात राष्ट्रबांधणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरले होते.
भारतीयांच्या अनेक पिढ्यांना डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अतुलनीय सेवेमुळे प्रेरणा मिळाली आहे.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
Remembering Dr. Rajendra Prasad on his Jayanti. pic.twitter.com/4uPv8aGAjf
— Narendra Modi (@narendramodi) December 3, 2017