Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तामिळनाडूतील चेन्नई येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक


नवी दिल्‍ली, 30 सप्‍टेंबर 2025

 

तमिळनाडूतील चेन्नई येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख  व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा  पंतप्रधानांनी व्यक्त  केली आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे;

“तामिळनाडूतील चेन्नई येथे इमारत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेमुळे अतिव दुःख झाले. अशा

कठीण काळात बाधित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी  यासाठी प्रार्थना करतो.

प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल, तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi” 

 

* * *

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai