Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तामिळनाडूमधल्या बस दुर्घटनेबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


तामिळनाडूतल्या तिरुपूर जिल्ह्यातील बस दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.

‘तामिळनाडूतल्या तिरुपूर जिल्ह्यात झालेल्या बस दुर्घटनेमुळे व्यथित झालो आहे. दु:खी कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. दुर्घटनेत जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे होतील, अशी आशा बाळगतो’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Kakade/P.Kor