पीएम्इंडिया
तुंगभद्रा स्टील प्रोडक्ट्स लिमिटेड, टीएसपीएल बंद करण्याबाबत, स्थावर मालमत्ता विक्री संदर्भात, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. टीएसपीएलची उर्वरित देणी फिटल्यानंतर या कंपनीचे नाव कंपनी रजिस्ट्रारमधून काढण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
या कंपनीच्या कर्मचारी आणि कामगार तसेच ऋणकोची देणी दिल्यानंतर ही कंपनी बंद करावी असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने 2015 मध्ये घेतला होता. 20,000 चौरस मीटर जमिनीसह एमएमएच प्लांट, कर्नाटक सरकारकडे हस्तांतरित करण्याला मान्यता देण्यात आली होती. कर्नाटक गृहनिर्माण मंडळाच्या वापरासाठी या कंपनीची होस्पेट इथली 82.37 एकर जागा विकायलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. 66 लाख रुपये प्रती एकर दराने, कर्नाटक सरकारला ही जमीन विकण्यात येत आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha