पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि ब्राझिल यांच्यात तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली.
या सामंजस्य करारामुळे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात दोन्ही देशात सहकार्य वाढवण्यास मदत होईल. विशेषत: ब्राझिल आणि भारत या दोन्ही देशात उत्खनन आणि उत्पादन उपक्रमांसाठी सहकार्य करता येईल. त्याशिवाय या क्षेत्रात संशोधन आणि विकास, द्रवरूप नैसर्गिक वायू प्रकल्प ब्राझिलमध्ये सुरू करण्यास सहकार्य, तेलऊर्जा आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्यांवर सहकार्य याशिवाय ऊर्जा क्षमता, ऊर्जा संशोधन आणि प्रादेशिक ऊर्जा पायाभूत सुविधांचा विस्तार करणे शक्य होणार आहे.
ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष या महिन्यात भारत भेटीवर येणार असून त्यावेळी या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
**********
S.Tupe/R.Aghor/P.Kor