Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तेल आणि वायू क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि इस्रायल यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तेल आणि वायू क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि इस्रायल यांच्यातील सामंजस्य कराराला मंजूरी देण्यात आली.

या सामंजस्य करारामुळे ऊर्जा क्षेत्रात भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षा आहे. या करारामुळे दोन्ही देशांना परस्परांच्या क्षेत्रात गुंतवणूकीला प्रोत्साहन देणे, तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण, संयुक्त अभ्यास राबविणे तसेच मनुष्यबळाची क्षमता उभारणी करणे सुलभ होणार आहे.

***

N.Sapre/M.Pange/Anagha