Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दिल्ली-मीरत द्रुतगती मार्गाच्या कोनशिला फलकाचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नोएडाच्या सेक्टर 62 मधे दिल्ली-मीरत द्रुतगती मार्गाच्या कोनशिला फलकाचे अनावरण केले.

ब्रिटीश राजवटीत 1857च्या स्वातंत्र्यासाठीच्या उठावाचं स्मरण करत दिल्ली-मीरत द्रुतगती मार्ग प्रदुषणापासून मुक्ती देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

विकासासाठी जनतेच्या आकांक्षांचा उल्लेख करतानाच उत्तम रस्ते विकासासाठीची प्राथमिक पूर्व अट असल्याचे पंतप्रधान म्हणाले. उत्तर-प्रदेशच्या पश्चिम भागात या द्रुतगती मार्गामुळे विकासाला चालना मिळेल, असं पंतप्रधान म्हणाले. सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प तसंच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे भारताला जोडण्याच्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या दूरदृष्टीचे स्मरणही त्यांनी केले.

शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधासाठीच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसह केंद्र सरकारच्या इतर विकास योजनांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

सरकारी नोकरीतल्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतल्या नोकरीसाठी मुलाखती घेणं रद्दबातल केल्यानं सरकारने देशातल्या युवकांना ही नववर्षाची भेट दिल्याचं पंतप्रधान म्हणाले.

2016मधे संसदेचं कामकाज चालू देऊन, गरीबांसाठी कार्य करण्याचा संकल्प सोडावा, असं आवाहन त्यांनी राजकीय पक्षांना केले. जनतेनं त्यांच्या लोकप्रतिनिधींनी संसदेत चर्चा करण्यासाठी निवडून दिले आहे आणि म्हणूनच हे त्यांचे कर्तव्यच असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. महेश शर्मा आणि केंद्रीय राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यावेळी उपस्थित होते.

N.Chitale/M.Desai