Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दुहेरी कर आणि कर चुकवेगिरी टाळण्या संदर्भात भारत आणि इराण यांच्यातल्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


भारत आणि इराण यांच्यात उत्पन्नावरचा दुहेरी कर टाळण्यासाठी आणि कर चुकवेगिरी रोखण्यासाठीच्या कराराला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे.

याकरारामुळे, भारतातून इराणमध्ये आणि इराणहून भारतात, गुंतवणुकीचा, तंत्रज्ञानाचा आणि कर्मचाऱ्यांचा ओघ वाढण्यासाठी चालना मिळणार आहे. सध्याच्याआंतरराष्ट्रीय मानकांनुसार या करारा अंतर्गत माहितीची देवाण घेवाण करण्यात येणार आहे.या करारामुळे पारदर्शकतावाढणार असून करचुकवेगिरीलाआळा बसण्यासाठी मदत होणार आहे.

भारतने इतर देशांबरोबर केलेल्या कराराच्या धर्तीवर हा करार आहे.G 20 ओईसीडी बेस इरोजन प्रोफिट शिफ्टिंग, बी ई पी एस प्रकल्पाच्याकिमानमानकांची पूर्तताही हा करार करत आहे.

प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 90 अनुसार केंद्र सरकार,एखाद्या देशाबरोबर दुहेरी कर टाळण्यासाठी किंवा प्राप्ती कर कायद्या अंतर्गत करपात्र उत्पन्नासंदर्भात,कर चुकवेगिरी टाळण्यासाठी माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी करार करू शकते.

BG/NS