पीएम्इंडिया
येथे उपस्थित सर्व वरिष्ठ मान्यवर, स्त्री आणि पुरुषगण
सर्वप्रथम मी दैनिक जागरणच्या प्रत्येक वाचकाला, वृत्तपत्राच्या प्रकाशनासाठी आणि वृत्तपत्र घराघरापर्यंत पोहचवण्याचे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे, विशेषतः विक्रेता बंधूंचे, तुमच्या संपादकीय टीमचे अमृत महोत्सवानिमित्त खूप-खूप अभिनंदन करतो , खूप-खूप शुभेच्छा देतो.
गेली 75 वर्षे तुम्ही अव्याहतपणे देशातील कोट्यवधी लोकांना माहिती आणि समस्यांशी जोडलेले आहे. देशाच्या पुनर्बांधणीत दैनिक जागरणने महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. देशाला जागरूक बनवण्यात तुम्ही महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आला आहात. भारत छोडो चळवळीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे कार्य सुरु केले आहे, ते आज नवीन भारताच्या नवीन आशा, नवीन संकल्प आणि नवीन संस्कारांना पुढे घेऊन जाण्यात सहकार्य करत आहे. दैनिक जागरणच्या वाचकांपैकी मी एक आहे. बहुधा तिथूनच सुरुवात होते. माझ्या अनुभवाच्या आधारे मी हे सांगू शकतो की गेल्या दशकांमध्ये दैनिक जागरणने देशात आणि समाजात परिवर्तन घडवून आणण्याच्या मोहिमेला बळ दिले आहे.
गेल्या चार वर्षात तुमचा समूह आणि देशातील तमाम माध्यम संस्थांनी राष्ट्र निर्माणाचा मजबूत स्तंभ या नात्याने आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली आहे. मग ते बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ अभियान असेल, स्वच्छ भारत अभियान असेल. या लोकचळवळी बनल्या आहेत. आणि माध्यमांचीही यात सकारात्मक भूमिका राहिली आहे. दैनिक जागरणने देखील यात प्रभावी योगदान देण्यासाठी कायम पुढाकार घेतला आहे. अलिकडेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. तेव्हा मला सांगण्यात आले होते की, स्वच्छतेसाठी तुम्ही सर्वजण कशाप्रकारे समर्पित वृत्तीने काम करत आहात.
मित्रांनो, समाजात माध्यमांची ही भूमिका आगामी काळात आणखी महत्वपूर्ण ठरणार आहे. आज डिजिटल क्रांतीने माध्यमांना , वृत्तपत्रांना आणखी विस्तारले आहे आणि मला वाटते की नवीन माध्यमे नव्या भारताच्या पायाला अधिक बळ देईल.
मित्रानो, जेव्हा जेव्हा आम्ही नवीन भारताबाबत बोलतो, तेव्हा किमान शासन, अधिक प्रशासन आणि सबका साथ सबका विकास याच्या मुळाशी , हाच मूलमंत्र घेऊन आम्ही बोलतो. आम्ही अशा एका व्यवस्थेबाबत बोलत आहोत,ज्याद्वारे लोकसहभागातून योजनेची निर्मिती देखील होईल आणि लोकसहभागातून त्यावर अमल देखील होईल. हाच विचार आम्ही गेल्या चार वर्षात पुढे नेला आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजनाना जनता आपली जबाबदारी समजून पुढे नेत आहे. सरकार, सरोकार आणि सहकार या भावना देशात मजबूत झाल्या आहेत.
देशातला तरुण आज विकासात स्वतःला भागधारक हितधारक मानू लागला आहे. सरकारी योजनांकडे आपुलकीच्या भावनेतून पाहिले जात आहे. त्याला जाणवतंय की त्याचा आवाज ऐकला जात आहे. आणि याच कारणामुळे सरकार आणि व्यवस्थेवरचा विश्वास आज अभूतपूर्व स्तरावर आहे. हा विश्वास तेव्हा जागा होतो जेव्हा सरकार निर्धारित उद्दिष्टे साध्य करताना दिसून येते. पारदर्शकतेसह काम करताना आढळून येते.
मित्रांनो, जागरण मंचात तुम्ही अनेक विषयांवर चर्चा करणार आहात. अनेक प्रश्न उपस्थित केले जातील, अनेक उत्तरे देखील शोधली जातील. एक प्रश्न तुमच्या मंचावर मी देखील विचारणार आहे. आणि प्रश्न माझा असला तरी त्याबरोबर संपूर्ण देशाच्या भावना जोडलेल्या आहेत.तुम्ही देखील बऱ्याचदा विचार करत असाल, विवंचनेत पडले असाल की, आपला देश मागास का राहिला. स्वातंत्र्य मिळून इतकी दशके उलटून गेल्यावरही तुमच्या मनात सतत हे विचार येत असतील की आपण मागे का राहिलो. आपल्याकडे विशाल सुपीक जमीन आहे, आपली तरुण मंडळी अतिशय प्रतिभावान आणि मेहनती आहे, आपल्याकडे नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता नाही, एवढे सगळे असूनही आपला देश पुढे का जाऊ शकला नाही. काय कारण असेल की छोटे-छोटे देश देखील ज्यांची संख्या खूप कमी आहे, ज्यांच्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती देखील नसल्यागत आहे, असे देश देखील अतिशय कमी वेळेत आपल्यापुढे निघून गेले.
आपले चांद्रयान चंद्रावर पोहचले ही आपल्या देशवासीयांची क्षमता आहे. आपण खूप कमी खर्चात मंगल मोहिमेसारखा महायज्ञ पूर्ण केला. मात्र या देशातील कोट्यवधी लोकांच्या गावापर्यंत रस्ते देखील पोहचले नाहीत याचे काय कारण असेल.
मित्रांनो, भारतीयांच्या संशोधनामुळे जग झगमगते आहे. मात्र काय कारण असेल की, कोट्यवधी भारतीयांना वीज देखील मिळत नव्हती. आपल्या देशातील लोक गेल्या सहा दशकांपेक्षा अधिक काळ पायाभूत सुविधांपासून का वंचित राहिले. मोठमोठे लोक सत्तेत आले, मात्र गेली अनेक दशके जे लोक छोट्या-छोटया समस्यांशी झगडत होते, त्यांच्या समस्यांवर तोडगा निघू शकला नाही.
मित्रांनो, लक्ष्याची कमतरता नव्हती, कमतरता होती इच्छेची, पैशांची कमतरता नव्हती,कमतरता होती आवड असण्याची, उपायांची कमतरता नव्हती, संवेदनांची कमतरता होती, सामर्र्थ्याची कमतरता नव्हती, कार्य संस्कृतीची कमतरता होती. अगदी सहजपणे काही लोक कबीरदासजींच्या त्या ध्येयाची चेष्टा करतात. ते म्हणाले होते, कल करे सो आज कर, आज करे सो अब , मात्र जरा विचार करा , ही भावना आपल्या कार्य संस्कृतिमध्ये अनेक दशकांपूर्वी आली असती, तर आज देशाचे चित्र काय असते.
मित्रांनो, अलिकडेच एलिफंटा पर्यंत पाण्याखालून केबल्सद्वारे वीज पोहचवण्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. माझीही नजर पडली , आशा करतो तुम्हीही पाहिला असेल. कल्पना करा, मुंबई पासून थोड्याच अंतरावर वसलेल्या लोकांना कसे वाटत असेल, जेव्हा ते स्वतः अंधारात दिवस-रात्र घालवत मुंबईचा झगमगाट पाहत असतील. त्या अंधारात 70 वर्षे घालवण्याची कल्पना करून पहा. आता काही दिवसांपूर्वीच मला एका व्यक्तीने पत्र लिहून आभार मानले, त्याने पत्र यासाठी लिहिले कारण मेघालय प्रथमच रेल्वेशी जोडले गेले होते. तुम्ही कल्पना करू शकता का,की आम्ही सत्तेवर येण्यापूर्वी मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा भारताच्या रेल्वे नकाशावर नव्हते. विचार करा, कुणी कशा प्रकारे या राज्यातील लोकांच्या जीवनावर प्रभाव पाडला असेल.
मित्रांनो, यापूर्वी देश कुठल्या दिशेने कुठल्या गतीने चालत होता आणि आज कुठल्या दिशेने आणि कुठल्या वेगाने जात आहे. हा माझ्या माध्यमातील मित्रांसाठी अभ्यासाचा आणि मंथनाचा विषय होऊ शकतो.केव्हा करतील ते मला माहित नाही. विचार करा, स्वातंत्र्यानंतरच्या ६७ वर्षांच्या काळात केवळ ३८ टक्के ग्रामीण घरांमध्ये शौचालय बांधण्यात आले आणि कसे …. प्रश्नांची उत्तरे येथे सुरु होतात, कसे, केवळ चार वर्षात 95 टक्के घरांमध्ये , ग्रामीण घरांमध्ये शौचालय उपलब्ध करून देण्यात आली. विचार करा … स्वातंत्र्यानंतरच्या ६७ वर्षांच्या काळात केवळ 55 टक्के वस्त्या, पाडे आणि गावांपर्यंत रस्ते पोहचले होते आणि कसे … केवळ चार वर्षात … रस्ते जोडणी वाढवून 90 टक्क्यांपेक्षा अधिक वस्त्या, गावे, पाड्यांपर्यंत पोहचवण्यात आले. विचार करा … का स्वातंत्र्यानंतरच्या ६७ वर्षांच्या काळात केवळ 55 टक्के घरांमध्ये गॅस जोडणी होती आणि आता कशी केवळ चार वर्षात गॅस जोडणीची व्याप्ती 90 टक्के घरांपर्यंत पोहचली आहे. विचार करा … स्वातंत्र्यानंतरच्या ६७ वर्षांच्या काळात केवळ 70 टक्के ग्रामीण कुटुंबांपर्यंत विजेची सुविधा पोहचली होती. आणि आता कशी … गेल्या चार वर्षात 95 टक्के ग्रामीण कुटुंबांपर्यंत वीज पोहचली आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न विचारता विचारता तासनतास निघून जातील, व्यवस्थांमध्ये अपूर्णतेपासून संपूर्णतेपर्यंत जातांना आपल्या देशाने गेल्या चार साडेचार वर्षात जी प्रगती केली आहे ती अभूतपूर्व आहे.
मित्रांनो, विचार करा… स्वातंत्र्यानंतरच्या 67 वर्षांच्या काळात केवळ 50 टक्के कुटुंबांकडेच बँक खाती होती. असे कसे झाले, देशातील बहुतेक प्रत्येक कुटुंब बँकिंग सेवेशी जोडले गेले आहे. विचार करा … असे का होते की स्वातंत्र्यानंतरच्या 67 वर्षांच्या काळात केवळ चार कोटी नागरिकच प्राप्तिकर विवरणपत्रे भरत होते. सव्वाशे कोटींचा देश … केवळ चार वर्षातच तीन कोटी नवीन नागरिक प्राप्तिकर जाळ्याशी जोडले गेले आहेत. विचार करा… असे का होते की जोवर जीएसटी लागू नव्हता , आपल्या देशात अप्रत्यक्ष कर प्रणालीद्वारे 66 लाख उद्योजकांची नोंदणी होती. आणि आता जीएसटी लागू झाल्यानंतर 54 लाख नवीन लोकांनी नोंदणी केली.
मित्रांनो, यापूर्वीची सरकारे असे का करू शकली नाहीत आणि आता जे होत आहे ते कसे होत आहे. लोक तेच आहेत , नोकरशाही तीच आहे, संस्था देखील त्याच आहेत , फायली जाण्याचा रस्ता देखील तोच आहे , टेबल, खुर्ची, पेन सगळे काही तेच आहे आणि तरीही हे परिवर्तन का झाले. या गोष्टीचा पुरावा आहे की देश बदलू शकतो. आणि मी तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की जो काही बदल झाला आहे , जे काही परिवर्तन झाले आहे , गती आली आहे ती तोवर येत नाही जोवर तळागाळाच्या स्तरापर्यंत जाऊन यासाठी प्रयत्न केले जात नाहीत , त्यांची अंमलबजावणी केली जात नाही.
तुम्ही कल्पना करा… जर देशातील नागरिकांना दशकांपूर्वीच मूलभूत गरजा उपलब्ध करून दिल्या असत्या तर आपला देश कुठून कुठे पोहचला असता. देशातील नागरिकांसाठी हे सगळे करणे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट होती. मात्र हे तेवढंच दुर्भाग्यपूर्ण आहे की, देशाला यासाठी इतकी वर्षे सोसावे लागले.
मित्रांनो, जेव्हा आपल्या देशातील गरीब, शोषित आणि वंचितांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध होतील… त्यांना शौचालय, बँक खाती, गॅस जोडणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या गोष्टींपासून मुक्ती मिळेल तेव्हा मग माझ्या देशातील गरीब लोक स्वतःच आपली गरीबी नष्ट करून दाखवतील. हा माझा विश्वास आहे. ते गरीबीतून बाहेर येतील, आणि देशही गरीबीतून बाहेर येईल. गेल्या चार वर्षात तुम्ही हे परिवर्तन घडताना पाहिले आहे. आकडे याची साक्ष देत आहेत, मात्र हे सगळे यापूर्वी झाले नाही. आणि यापूर्वी अशासाठी झाले नाही कारण गरीबी कमी झाली तर गरीबी हटवाचा नारा कसा देता येईल. पूर्वी झाले नाही कारण जर मूलभूत सुविधा सर्वाना मिळाल्या, तर वोट बँकेचे राजकारण कसे होईल. तुष्टीकरण कसे होईल.
बंधू आणि भगिनींनो, आज जेव्हा आम्ही देशातील 100 टक्के लोकांना बहुतांश सर्व मूलभूत सुविधा पुरवण्याच्या जवळ पोहचलो आहोत, तेव्हा भारत दुसऱ्या युगात झेप घेण्यासाठी देखील तयार आहे. आपल्या कोट्यवधी भारतीयांच्या महत्वाकांक्षा , त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तत्पर आहोत. आज आम्ही नवीन भारताच्या संकल्पापासून सिध्दीपर्यंतच्या प्रवासाच्या दिशेने अग्रेसर आहोत. या प्रवासात ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर भारत करत आहे, ते जगातील विकसनशील आणि मागास देशांसाठी देखील एक आदर्श बनत आहे.
मित्रांनो, आज भारतात कनेक्टिव्हिटी पासून कम्युनिकेशन पर्यंत , कॉम्पिटिशन पासून कन्व्हिनिअन्स आयुष्यातील प्रत्येक पैलूला तंत्राशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. तंत्र आणि मानवीय संवेदनांच्या शक्तीने ease of leaving सुनिश्चित केले जात आहे. आपली व्यवस्था वेगाने नवीन जगाच्या गरजांसाठी तयार होत आहे. सौर ऊर्जा असेल, जैवइंधन असेल, यावर आधुनिक व्यवस्था तयार केल्या जात आहेत.
देशात आज २१ व्या शतकातील आवश्यकता नजरेस ठेऊन पुढल्या पिढीच्या पायाभूत सुविधा तयार होत आहेत. महामार्ग असेल, रेल्वे असेल, हवाईमार्ग असेल, जलमार्ग असेल, चहूबाजूला काम सुरु आहे. अलिकडेच तुम्ही पाहिले कशा प्रकारे वाराणसी आणि कोलकाता दरम्यान जलमार्गाची नवीन सुविधा कार्यरत झाली आहे. अशाच प्रकारे देशात बनलेली विना इंजिन चालकवाली ट्रेन.. ट्रेन १८ आणि आणि त्याची चाचणी तर तुमच्या वृत्तपत्रातील हेडलाईनमध्ये राहिली आहे. विमान वाहतुकीची स्थिती तर अशी झाली आहे कि आज वातानुकूलित डब्यांमधून जाणार्या यात्रेकरूंपेक्षा अधिक लोक आता विमानातून प्रवास करू लागले आहेत. हे यामुळे घडत आहे कारण सरकार छोट्या छोट्या शहरांना टियर-2 सीटीज, टियर-3 सीटीज यांनाही उडान योजनेशी जोडत आहे. नवीन विमानतळ आणि हवाई मार्ग विकसित करत आहे. व्यवस्थेत चहुबाजूला बदल कसा घडत आहे , ते समजून घेणे अतिशय आवश्यक आहे.
एलपीजी सिलेंडर रिफिलसाठी पूर्वी अनेक दिवस लागायचे , आता केवळ एक दोन दिवसात मिळायला सुरुवात झाली आहे. पूर्वी प्राप्तिकर परतावा मिळायला अनेक महिन्यांचा कालावधी लागायचा. ते देखील आता काही आठवड्यांवर आले आहे. पासपोर्ट बनवायला देखील पूर्वी कित्येक महिने लागायचे, आता तेच काम एक दोन आठवड्यात होते. वीज, पाण्याची जोडणी आता सहज मिळू लागली आहे. सरकारच्या बहुतांश सेवा आता ऑनलाईन आहेत, मोबाईल फोनवर आहेत. यामागची भावना एकच आहे, की सामान्य माणसाला व्यवस्थेशी झगडावे लागू नये, रांगा लागू नयेत, भ्रष्टाचाराच्या शक्यता कमी व्हाव्यात आणि दैनंदिन त्रासातून मुक्ती मिळावी.
मित्रांनो, सरकार केवळ सेवा दारोदारी पोहचवण्यासाठी कटिबद्ध नाही तर योजनांचा लाभ गरजवंतांपर्यंत अवश्य पोहचावा यासाठी देखील गंभीर प्रयत्न करत आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मिळणारी घरे असतील, उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणाऱ्या गॅस जोडण्या असतील, सौभाग्य योजनेअंतर्गत विजेची जोडणी असेल, शौचालयाच्या सुविधा असतील. अशा तमाम योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत सरकार स्वतः जात आहे, त्यांची ओळख पटवत आहे, त्यांना या सुविधा घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. देशातील 50 कोटींहून अधिक गरीबांच्या आरोग्याला सुरक्षाकवच देणारी प्रधानमंत्री जन-आरोग्य योजना PMJAY म्हणजे आयुष्मान भारत योजना तर कल्याण आणि समान न्यायाचे उत्तम उदाहरण आहे.
डिजिटल तंत्रज्ञान automation आणि मानवी संवेदनशीलतेच वापर सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कसा करता येईल. हे आयुष्मान भारतमध्ये दिसून येते. या योजनेतील लाभार्थ्यांची आधी ओळख पटवण्यात आली, नंतर त्यांची माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडण्यात आली आणि मग गोल्डन कार्डे जारी केली जात आहेत. गोल्डन कार्डस् आणि आयुष्मान मित्र म्हणजे तंत्रज्ञान आणि मानवी संवेदना यांच्या संगमातून गरीबातील गरीबाला आरोग्याचा लाभ अगदी मोफत मिळत आहे.
मित्रांनो, अजून या योजनेला 100 दिवस देखिल झाले नाहीत, केवळ तीन महिन्यांपेक्षा कमी काळ लोटला आहे आणि आतापर्यंत देशातील साडेचार लाख गरीबानी याचा लाभ घेतला आहे किंवा रुग्णालयात उपचार घेत आहेत. गर्भवती महिलांच्या शस्त्रक्रियेपासून कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरचे उपचार आयुष्मान भारत मुळे शक्य झाले आहेत.
अशा स्थितीत असलेल्या, या झगमगाटापासून दूर अनेक लोकांचा विचार करा… कि हे लोक कोण आहेत, , हे श्रमिक आहेत, हे कामगार आहेत, शेतकरी आहेत शेत आणि कारखान्यात मजुरी करणारे लोक आहेत, ठेला चालवणारे, रिक्शा चालवणारे लोक आहेत. कपडे शिवण्याचे काम करणारे लोक आहेत. कपडे धुऊन उदरनिर्वाह करणारे लोक आहेत. गाव आणि शहरातील असे लोक जे गंभीर आजारांवरचे उपचार केवळ यासाठी टाळत होते कारण त्यांच्यासमोर एक भले मोठे प्रश्नचिन्ह नेहमी असायचे… आपल्या औषधांवर खर्च करायचा की कुटुंबासाठी दोन वेळच्या भाकरीवर खर्च करायचा. आपल्या औषधांवर खर्च करायचा की मुलांच्या अभ्यासावर खर्च करायचा. गरीबांना या प्रश्नाचे उत्तर आयुष्मान भारत योजनेच्या रूपाने मिळालेले आहे.
मित्रांनो, गरिबांच्या सशक्तीकरणाचे माध्यम बनवणारे हे काम केवळ इथपर्यंत मर्यदित राहणार नाही. आगामी काळात याचा विस्तार केला जाणार आहे. आमचा प्रयत्न आहे की, अडत्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हटवले जावे. उत्पादक आणि ग्राहक याना जितके शक्य होईल तेवढे जवळ आणले जाईल. भ्रष्टाचार मग तो कुठल्याही स्तरावर असेल,आमचे धोरण स्पष्टही आहे आणि कठोर देखील आहे. या क्षेत्रात केले जाणारे आमचे प्रयत्न जग देखील पाहत आहे. आणि म्हणूनच भारताला संधींचा देश म्हटले जात आहे.
मित्रानो जसे तुम्ही सर्वजण जाणता , काही दिवसांपूर्वी अर्जेंटिना मध्ये जी-20 परिषद झाली, त्या परिषदेत आलेल्या नेत्यांशी मी चर्चा केली. आम्ही आमच्यातले संभाषण देखील जगातील सामर्थ्यवान अर्थव्यवस्थांसमोर मांडले. जे आर्थिक गुन्हे करणारे आहेत, फरार आहेत, त्यांना जगात कुठेही सुरक्षित आसरा मिळू नये यासाठी भारताने काही सूचना आंतरराज्य समुदायाकडे मांडल्या. मला खात्री आहे की आमची ही मोहीम आज ना उद्या कधी ना कधी यशस्वी होईल.
मित्रांनो, या विश्वासामागचे एक मोठे कारण हे आहे कि आज भारताचे म्हणणे जग ऐकत आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. जगातील अनेक देशांशी आमचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण आहेत. त्याचे परिणाम तुम्ही सर्व आणि संपूर्ण देश देखील पाहतही आहे, अनुभव देखील करतो आहे’आताच तीन-चार दिवसांपूर्वी याचे आणखी एक उदाहरण तुम्ही पाहिले आहे, हे सगळे संभव होत आहे आमच्या विश्वासामुळे , आमच्या देशाच्या आत्मविश्वासामुळे,
मित्रांनो, आज मोठमोठी उद्दिष्ट्ये, कठोर आणि मोठे निर्णय घेण्याचे धाडस सरकार करू शकत आहे कारण त्यामागे एक मजबूत सरकार आहे. पूर्ण बहुमताने निवडून आलेले सरकार आहे. नवीन भारतासाठी सरकारचा भर – सामर्थ्य, संसाधन, संस्कार, परंपरा, संस्कृति आणि सुरक्षा यावर आहे. विकासाची पंच धारा, जी विकासाच्या गंगेला पुढे नेईल. ही विकासाची पंच धारा- मुलांचे शिक्षण, युवकांना रोजगार, वृद्धांना औषधे, शेतकऱ्यांना सिंचन, जन-जनची सुनावणी. या पाच धारांना केंद्रस्थानी ठेऊन सरकार विकासाची गंगा पुढे नेत आहे.
नवीन भारताची नवीन स्वप्ने साकार करण्यात दैनिक जागरणची, संपूर्ण माध्यम जगताची देखील महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारणे ही तुमची जबाबदारी आहे आणि तुमचा अधिकार देखील आहे. माध्यमांच्या सूचना आणि तुमच्या टीकेचे तर मी नेहमीच स्वागत करत आलो आहे. आपले स्वातंत्र्य कायम राखत, आपला निष्पक्षपणा कायम राखत दैनिक जागरण समूह राष्ट्र निर्माणाचा पहारेकरी म्हणून अव्याहत कार्य करत राहील. याच आशेसह , याच विश्वासासह मी माझे भाषण संपवतो. तुम्हा सर्वाचे ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन आणि उज्वल भविष्यासाठी अनेक-अनेक शुभेच्छा देत मी माझ्या आवाजाला विराम देतो. खूप-खूप धन्यवाद.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
सबसे पहले मैं दैनिक जागरण के हर पाठक को, अख़बार के प्रकाशन और अख़बार को घर-घर तक पहुंचाने के कार्य से जुड़े हर व्यक्ति को, हॉकर बंधुओं को आपकी संपादकीय टीम को, हीरक जयंति पर बहुत-बहुत बधाई देता हूं, शुभकामनाएं देता हूं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
देश के पुनर्निर्माण में आपने महत्वपूर्ण भूमिका निभाई है, देश को जागरुक करने में दैनिक जागरण का अहम रोल रहा है। भारत छोड़ो आंदोलन की पृष्ठभूमि में जो कार्य आपने शुरु किया, वो आज नए भारत की नई उम्मीदों, नए संकल्पों और नए संस्कारों को आगे बढ़ाने में सहयोग कर रहा है: PM
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
मैं तो खुद भी दैनिक जागरण का पाठक रहा हूं। अपने अनुभव के आधार पर मैं कह सकता हूं कि बीते दशकों में दैनिक जागरण ने देश और समाज में बदलाव लाने की मुहिम को शक्ति दी है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
बीते चार वर्षों में आपके समूह और देश के तमाम मीडिया संस्थानों ने राष्ट्र निर्माण के मजबूत स्तंभ के तौर पर अपने दायित्व का बखूबी निर्वहन किया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
चाहे वो बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ अभियान हो, स्वच्छ भारत अभियान हो, ये अगर जन आंदोलन बने हैं, तो इसमें मीडिया की भी एक सकारात्मक भूमिका रही है। दैनिक जागरण भी इसमें अपना प्रभावी योगदान देने के लिए हमेशा आगे रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
समाज में मीडिया का ये रोल आने वाले समय में और भी महत्वपूर्ण होने वाला है। आज डिजिटल क्रांति ने मीडिया को, अखबारों को और विस्तार दिया है। मेरा मानना है कि ये नया मीडिया, नए भारत की नींव को और ताकत देगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
नए भारत की जब भी हम बात करते हैं तो Minimum Government, Maximum Governance और सबका साथ, सबका विकास इसके मूल में है। हम एक ऐसी व्यवस्था की बात करते हैं जहां जनभागीदारी से योजनाओ का निर्माण भी हो और जनभागीदारी से ही उन पर अमल भी हो: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
इसी सोच को हमने बीते चार वर्षों से आगे बढ़ाया है। केंद्र सरकार की अनेक योजनाओं को जनता अपनी जिम्मेदारी समझकर आगे बढ़ा रही हैं। सरकार, सरोकार और सहकार, ये भावना देश में मज़बूत हुई है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
देश का युवा आज विकास में खुद को स्टेक होल्डर मानने लगा है, सरकारी योजनाओं को अपनेपन के भाव से देखा जाने लगा है। उसको लगने लगा है कि उसकी आवाज़ सुनी जा रही है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
यही कारण है कि सरकार और सिस्टम पर विश्वास आज अभूतपूर्व स्तर पर है। ये विश्वास तब जागता है, जब सरकार तय लक्ष्य हासिल करते हुए दिखती है, पारदर्शिता के साथ काम करती हुई नज़र आती है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
आप भी अकसर सोचते होंगे, हैरत में पड़ते होंगे, कि आखिर हमारा देश पिछड़ा क्यों रह गया? आजादी के इतने दशकों के बाद ये कसक आपके मन में भी होगी कि हम क्यों पीछे रह गए।
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
हमारे पास विशाल उपजाऊ भूमि है: PM @narendramodi
हमारे नौजवान बहुत प्रतिभाशाली और मेहनती भी हैं। हमारे पास प्राकृतिक संसाधनों की भी कोई कमी नहीं। इतना सब कुछ होने के बावजूद हमारा देश आगे क्यों नहीं बढ़ पाया: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
मंजिलों की कमी नहीं थी, नीयत की कमी थी।
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
पैसों की कमी नहीं थी, Passion की कमी थी।
Solutions की कमी नहीं थी, संवेदना की कमी थी।
सामर्थ्य की कमी नहीं थी, कमी थी कार्यसंस्कृति की।
बहुत आसानी से कुछ लोग कबीरदास जी के उस दोहे को बिगाड़कर मजाक बना देते हैं जिसमें उन्होंने कहा था- “काल करे सो आज कर, आज करे सो अब”: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
हाल ही मैंने एलिफेंटा तक Underwater Cables के जरिए बिजली पहुंचाने का एक वीडियो देखा। उम्मीद है, आपने भी देखा होगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
कल्पना कीजिए, मुंबई से थोड़ी ही दूरी पर बसे लोगों को कैसा लगता होगा, जब वो खुद अंधेरे में रात-दिन गुजारते हुए मुंबई की चकाचौंध को देखते होंगे। उस अंधेरे में 70 साल गुजार देने की कल्पना करके देखिए: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
अभी कुछ दिन पहले ही मुझे एक व्यक्ति ने पत्र लिखकर धन्यवाद दिया। उसने पत्र इसलिए लिखा क्योंकि मेघालय पहली बार ट्रेन सेवा से जुड़ गया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
क्या आप कल्पना कर सकते हैं कि हमारे सत्ता में आने से पहले मेघालय, मिजोरम और त्रिपुरा भारत के रेल मैप में ही नहीं थे। सोचिए, इसने किस तरह इन राज्यों के लोगों की जिंदगी पर असर डाला होगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
सोचिए, आखिर क्यों आजादी के 67 साल तक केवल 38 प्रतिशत ग्रामीण घरों में ही शौचालय बने और कैसे केवल चार साल में 95 प्रतिशत ग्रामीण घरों को शौचालय उपलब्ध करा दिए: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
सोचिए, आखिर क्यों, आजादी के 67 साल बाद तक केवल 55 प्रतिशत बस्तियों, टोले और गांव तक ही सड़क पहुंची थी और कैसे केवल चार साल में सड़क संपर्क को बढ़ाकर 90 फीसदी से ज्यादा बस्तियों, गांव, टोलों तक पहुंचा दिया गया: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
सोचिए, आखिर क्यों आजादी के 67 साल बाद तक केवल 55 प्रतिशत घरों में ही गैस का कनेक्शन था और अब कैसे केवल 4 साल में गैस कनेक्शन का दायरा 90 फीसदी घरों तक पहुंचा दिया: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
सोचिए, आखिर क्यों, आजादी के बाद के 67 वर्षों तक केवल 70 प्रतिशत ग्रामीण परिवारों तक ही बिजली की सुविधा पहुंची थी और अब कैसे बीते चार वर्षों में 95 प्रतिशत ग्रामीण परिवारों तक बिजली पहुंच गई है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
व्यवस्थाओं में अपूर्णता से संपूर्णता की तरफ बढ़ते हमारे देश ने पिछले चार-साढ़े चार वर्षों में जो प्रगति की है, वो अभूतपूर्व है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
सोचिए कि आखिर क्यों, आजादी के 67 वर्षों तक देश के सिर्फ 50 प्रतिशत परिवारों के पास ही बैंक खाते थे और ऐसा कैसे हुआ कि आज देश का लगभग हर परिवार बैंकिंग सेवा से जुड़ गया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
सोचिए, कि आखिर ऐसा क्यों था कि आजादी के 67 वर्षों तक बमुश्किल 4 करोड़ नागरिक ही इनकम टैक्स रिटर्न भर रहे थे और केवल चार वर्ष में ही तीन करोड़ नए नागरिक इनकम टैक्स के नेटवर्क से जुड़ गए हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
सोचिए कि आखिर क्यों ऐसा था कि जब तक GST नहीं लागू हुआ था, हमारे देश में Indirect Tax सिस्टम से 66 लाख उद्यमी ही रजिस्टर्ड थे और अब GST लागू होने के बाद 54 लाख नए लोगों ने रजिस्टर कराया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
जब हमारे देश के गरीब, शोषित और वंचितों को सारी मूलभूत सुविधाएं उपलब्ध हो जाएंगी, उन्हें शौचालय, बिजली, बैंक अकाउंट, गैस कनेक्शन जैसी चीजों की चिंताओं से मुक्ति मिल जाएगी, तो फिर मेरे देश के गरीब खुद ही अपनी गरीबी को परास्त कर देंगे: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
बीते चार वर्षों में आप इस परिवर्तन को होते हुए देख भी रहें हैं। आंकड़े इसकी गवाही दे रहे हैं।
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
लेकिन ये सब पहले नहीं हुआ।
पहले इसलिए नहीं हुआ क्योंकि गरीबी कम हो जाएगी, तो ‘गरीबी हटाओ’ का नारा कैसे दे पाएंगे: PM @narendramodi
आज हम शत-प्रतिशत लोगों को करीब-करीब सभी मूलभूत सुविधाएं देने के करीब पहुंच गए हैं, तो भारत दूसरे युग में छलांग लगाने के लिए तैयार है। करोड़ों भारतीयों की Aspirations, उनकी आकांक्षाओं को पूरा करने के लिए तत्पर हैं। आज हम न्यू इंडिया की संकल्प से सिद्धि की यात्रा की ओर अग्रसर हैं।
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
आज भारत में Connectivity से लेकर Communication तक, Competition से लेकर Convenience तक, जीवन के हर पहलू को तकनीक से जोड़ने का प्रयास हो रहा है। तकनीक और मानवीय संवेदनाओं की शक्ति से Ease of Living सुनिश्चित की जा रही है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
गरीब के सशक्तिकरण का माध्यम बनाने का ये काम सिर्फ यहीं तक सीमित नहीं रहने वाला है, इसको आने वाले समय में विस्तार दिया जाना है। हमारा प्रयास है कि बिचौलियों को तकनीक के माध्यम से हटाया जाए: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
उत्पादक और उपभोक्ता को जितना संभव हो पाए उतना पास लाया जाए। भ्रष्टाचार चाहे किसी भी स्तर पर हो, हमारी नीति स्पष्ट भी है और सख्त भी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
जैसा कि आप सभी जानते हैं पिछले दिनों अर्जेंटीना में G-20 का सम्मेलन हुआ। उस सम्मेलन में आए नेताओं से मेरी बातचीत हुई, हमने अपनी बातें भी दुनिया की ताकतवर अर्थव्यवस्थाओं के बीच रखी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
जो आर्थिक अपराध करने वाले हैं, भगोड़े हैं, उनको दुनिया में कहीं भी सुरक्षित पनाहगाह ना मिले इसके लिए भारत ने कुछ सुझाव अंतर्राष्ट्रीय समुदाय के बीच रखे हैं। मुझे विश्वास है कि हमारी ये मुहिम रंग लाएगी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
आज बड़े लक्ष्यों, कड़े और बड़े फैसलों का अगर साहस सरकार कर पाती है, तो उसके पीछे एक मजबूत सरकार है, पूर्ण बहुमत की सरकार है। New India के लिए सरकार का फोकस सामर्थ्य, संसाधन, संस्कृति और सुरक्षा पर है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
विकास की पंचधारा यानि बच्चों को पढ़ाई, युवा को कमाई, बुजुर्गों को दवाई,किसान को सिंचाई और जन-जन की सुनवाई, इसी को केंद्र में रखते हुए सरकार आगे बढ़ रही है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
नए भारत के, नए सपनों को साकार करने में दैनिक जागरण की, पूरे मीडिया जगत की भी एक महत्वपूर्ण भूमिका रहने वाली है। सिस्टम से सवाल करना आपकी जिम्मेदारी है, आपका अधिकार है।
— PMO India (@PMOIndia) December 7, 2018
मीडिया के सुझावों, और आपकी आलोचनाओं का तो मैं हमेशा स्वागत करता रहा हूं: PM @narendramodi