पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात सहकार्याबाबत भारत आणि इटली यांच्यातील सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले. नवी दिल्लीत 30ऑक्टोबर 2017 रोजी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आनंद कुमार आणि इटलीचे भारतातील राजदूत लॉरेंझो अँजेलोनी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
परस्परांच्या हिताच्या नवीन आणि नवीकरणीय मुद्द्यांबाबत तांत्रिक द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी संस्थात्मक संबंध स्थापन करण्याचा उभय देशांचा उद्देश आहे. सहकार्याच्या क्षेत्रांबाबत बाबींचा आढावा, देखरेख आणि चर्चा करण्यासाठी संयुक्त कृती समिती स्थापन करण्याचे या करारात प्रस्तावित आहे. उभय देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी माहितीचे आदान प्रदान करणे हा याचा उद्देश आहे.
N.Sapre/S.Kane/Anagha