Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्लीत द्वारका इथं जागतिक दर्जाचं प्रदर्शन तथा सभा केंद्र


नवी दिल्लीत द्वारका, सेक्टर 25 इथे जागतिक दर्जाचं प्रदर्शन तथा सभा केंद्र उभारण्यासाठी 89.72 हेक्टर जमीन हस्तांतरित करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं स्वीकृती दिली.

औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाला ही जमीन देण्यात येणार आहे. या केंद्रात प्रदर्शन दालन, सभा केंद्र, वित्तीय केंद्र, हॉटेल्स, किरकोळ क्षेत्र सेवा उपलब्ध होतील.

पारदर्शी आणि स्पर्धात्मक प्रकल्पनिर्मिती आणि विकासाच्या पर्यायांसह प्रकल्प पुढे नेण्याच्या दृष्टीने एका समितीच्या स्थापनेलाही मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाचे सचिव, नागरी विकास, व्यय खात्याचे सचिव, अर्थविषयक खात्याचे सचिव तसंच नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा या समितीत समावेश राहील.

सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून हा प्रकल्प साकारला जाणार असून आवश्यकता भासल्यास व्यवहार्यता खंड निधीचा उपयोग केला जाईल.

N. Chitale /S.Tupe / M. Desai