पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नवी दिल्लीतील चाणक्यपुरी भागातील २८०० चौ. मी.चा प्लॉट क्र. ३१-बी साठी फिजी दूतावासाला व्यावसायिक दराने शुल्क आकारणीपासून सवलत द्यायला आणि फिजीतील सुवा येथे भारतीय दूतावासासाठी फिजीने ज्या अटी आणि शर्ती लावल्या त्याच अटी आणि शर्ती लावायला मंजुरी दिली आहे.
पार्श्वभूमी
ऑगस्ट २०१५ मध्ये फिजी सरकारने सुवा येथे भारतीय दूतावासाला ६६९५ चौ. मी. भूखंड ९९ वर्षांच्या भाडेतत्वावर वार्षिक १०० फिजी डॉलर दराने दिला होता. दर पाच वर्षांनी त्याचे मूल्यमापन केले जाते. फिजीबरोबरचे द्विपक्षीय संबंध लक्षात घेऊन फिजीच्या दूतावासाला वितरित केलेल्या भूखंडासाठी व्यावसायिक दराने शुल्क आकारणीतून सवलत द्यायचा निर्णय घेण्यात आला.
N.Sapre/S.Kane/P.Kor