पीएम्इंडिया
आपल्या सशस्त्र सेनांप्रती देशाला वाटणारा अभिमान आणि कौतुकाची भावना येत्या दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष अभियानाच्या माध्यमातून नाविन्याने व्यक्त होणार आहे.
#Sandesh2Soldiers या अभियानाच्या माध्यमातून देशाच्या सीमेवर, आपल्या प्रियजनांपासून दिवाळी साजरी करणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या जवानांमध्ये आनंद आणि उत्साह पोहचविण्याची संधी प्रत्येक नागरिकाला प्राप्त होणार आहे.
सशस्त्र दलांना पत्र आणि संदेश पाठविण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यासाठी आणि निमंत्रित करण्यासाठी एक समग्र अभियान राबविण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या कल्पनेतून साकारलेले हे अभियान सोशल मिडियावर एका विशेष चित्रफितीच्या माध्यमाद्वारे आपल्या शूर सैन्यदलाच्या जवानांना संदेश पाठविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. जारी झाल्यापासून तासाभरातच ट्विटर आणि फेसबुकसारख्या मंचावर या चित्रफितीने अनेकांच्या मनात औत्सुक्य निर्माण केले आहे.
या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना नरेंद्र मोदी ॲपवर MyGov.in च्या माध्यमातून तसेच आकाशवाणीच्या माध्यमातून सैन्यातील जवानांना संदेश पाठविता येतील. सैन्य दलाप्रती नागरिकांच्या मनातील भावना विशद करणारा कार्यक्रम दूरदर्शनवर सादर केला जाईल.
सैन्य दलातील जवानांना स्वत:च्या हस्ताक्षरातील संदेश पाठवून शुभेच्छा देता याव्यात यासाठी नरेंद्र मोदी ॲपवर एक विशेष मोडयूल जारी करण्यात आले आहे.
#Sandesh2Soldiers या अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि सैन्यदलातील जवान यांच्यात परस्पर संवाद वाढविणे अपेक्षित आहे. यापूर्वी याच महिन्यात भोपाळ येथे झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी आपल्या शूर जवानांच्या आयुष्यातील मानवी पैलू दुर्लक्षित राहू नये असे म्हटले होते. जवानांशी भेट होईल तेव्हा त्यांना सन्मानाची वागणूक देण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनालाही सोशल मिडीयावर चांगलाच प्रतिसाद मिळाला.
पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी दोन्ही वर्षातील दिवाळी सण सैन्य दलांसोबत साजरे केले आहेत.
B.Gokhale/M.Pange/Anagha
This Diwali, let us remember our courageous armed forces who constantly protect our Nation. Jai Hind. pic.twitter.com/uXf6Or3xsQ
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2016
I sent my #Sandesh2Soldiers. You could also do the same. Your wishes will certainly make our forces very happy. https://t.co/TYuxNNJfIf
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2016
मैंने अपना #Sandesh2Soldiers भेज दिया है। आप भी जरूर भेजिए। https://t.co/TYuxNNJfIf pic.twitter.com/aHzHfeQGkf
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2016
सवा सौ करोड़ देशवासी जब सैनिकों के साथ खड़े होते हैं तो उनकी शक्ति सवा सौ करोड़ गुना बढ़ जाती है।
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2016