Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नागरी उड्डाण सुरक्षेत सहकार्याला प्रोत्साहन आणि विकासासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नागरी उड्डाण सुरक्षेत सहकार्याला प्रोत्साहन आणि विकासासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.

या सामंजस्य करारामुळे भारतीय हवाई सुरक्षा अधिकाऱ्यांना ऑस्ट्रेलियन विमान कंपन्यांबरोबर ज्ञान आणि अनुभवाचे आदान-प्रदान करण्याची संधी मिळेल आणि भारतातील एकूणच हवाई सुरक्षा वाढण्यास मदत होईल.

या सामंजस्य करारामुळे आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील तसेच दोन्ही देशांदरम्यान सुरक्षा सहकार्य क्षेत्रातील प्रोत्साहन वाढेल.

N.Sapre/S.Kane/D.Rane