Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘नाटु नाटु’ला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण चमूचे पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगीत दिग्दर्शक एम एम कीरवानी , गीतकार चंद्रबोस आणि  ‘नाटु नाटु’ या ‘गाण्याला ‘सर्वोत्कृष्ट स्वतंत्र गीत’ या विभागातील ऑस्कर पुरस्कार मिळवल्याबद्दल ‘आर आर आर’ चित्रपटाच्या   संपूर्ण चमूचे  अभिनंदन केले. 

‘आर आर आर’ चित्रपटातील ‘नाटु नाटु’ हे गाणे जगभरात लोकप्रिय झाले असून त्याचे हे यश उल्लेखनीय असल्याचे प्रधानमंत्र्यांनी म्हटले आहे. 

अकादमी पुरस्काराकडून केल्या गेलेल्या ट्विट ला उत्तर देताना प्रधानमंत्र्यांनी ट्विट केले, 

“उल्लेखनीय !

‘नाटु नाटु’ हे गाणे जगभरात लोकप्रिय झाले असून हे गाणे आगामी अनेक वर्ष संस्मरणीय ठरेल. @mmkeeravaani ,@boselyricist  आणि  संपूर्ण चमूचे या प्रतिष्ठित सन्मानासाठी अभिनंदन. 

संपूर्ण भारत यासाठी आनंदित आहे आणि भारताला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे. #Oscars”

****

Jaidevi PS/Uma/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai