Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नाबार्ड कायदा 1981 मधे सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता


राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक कायदा 1981 मध्ये, विधेयकाच्या मसुद्यानुसार प्रस्तावित सुधारणांच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री मंडळाने मंजुरी दिली. नाबार्डचे भाग भांडवल 5000 कोटींवरून 30,000 कोटी पर्यन्त वाढवण्याची आणि आवश्यकता भासल्यास रिझर्व्ह बँकेशी सल्ला मसलत करून ते 30,000 कोटी पुढेही वाढवण्याची तरतूद या सुधारणेद्वारे करण्यात येणार आहे.

नाबर्डमधले, रिझर्व्ह बँकेचे 0.4 टक्के आणि 20 कोटी रुपये मूल्याचे समभाग केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

भांडवलात वृद्धीमुळे नाबर्डला दीर्घ कालीन सिंचन निधींविषयी वचनबद्धता पूर्ण करण्याला मदत होणार आहे.

N.Sapre/N.Chitale/D.Rane