Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

निःस्वार्थ त्यागाच्या शाश्वत वारशाची महती सांगणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक


नवी दिल्ली,6 जुलै 2026

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. जे लोक इतरांच्या कल्याणासाठी त्याग करतात ते अमर होत असल्याचे यामध्ये अधोरेखित केले आहे.

“जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धाः कवीश्वराः।

नास्ति येषां यशःकाये जरामरणजं भयम्॥”

मोदी यांनी असेही सांगितले आहे की भारताची एकता, अखंडता आणि आत्मसन्मानासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले आहेः

भारताची एकता, अखंडता आणि स्वाभिमानासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.

जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धाः कवीश्वराः।

नास्ति येषां यशःकाये जरामरणजं भयम्॥

निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर