Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नेदरलँड्सचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल रॉब जेटन यांचे पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन


नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2026

नेदरलँड्सचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल रॉब जेटन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

भारत आणि नेदरलँड्समधील विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या व्यापक संबंधांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. उभय  देशांमधील आणि तेथील लोकांचा-लोकांमधील वाढत्या संबंधांना आणखी गती देण्यासाठी पंतप्रधान जेटन यांच्याबरोबर  एकत्रित  काम करण्यास आपण  उत्सुक असल्याचे पंतपधान  मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्‍यमावर लिहिले;

“नेदरलँड्सचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल रॉब जेटन यांचे अभिनंदन. भारत आणि नेदरलँड्सचे विविध क्षेत्रांमध्ये व्यापक सामायिक संबंध आहेत. दोन्ही देशांमधील आणि लोकां-लोकांमधील  वाढत्या संबंधांना आणखी गती देण्यासाठी आपल्याबरोबर एकत्रित काम करण्यास उत्सुक आहे.”

शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai