Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बातचीत


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांच्याशी आज दूरध्वनीवरुन चर्चा केली. नेपाळमधल्या हिंसाचारातल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त करतानाच मृतांच्या कुटुंबियांकडे त्यांनी शोकभावना प्रकट केल्या आहेत. नेपाळमधल्या राजकीय आणि सामाजिक अस्थैर्याबद्दल चिंता व्यक्त करतानाच यामुळे नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाच्या आपत्तीत भर पडणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. संयम राखत शांतता आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्याचं आवाहन त्यांनी केले. सरकार, सर्व राजकीय पक्ष आणि जनतेनं हिंसा टाळून सामाजिक सलोखा राखावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

शांतता प्रक्रिया आणि राज्यघटना मसुदा तयार करण्यात नेपाळने केलेल्या ऐतिहासिक प्रगतीची त्यांनी प्रशंसा केली. समाजाच्या सर्व स्तरात विश्वासाचे वातावरण अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने नेपाळमधल्या राजकीय नेतृत्वाने सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर जनतेसह सर्व राजकीय पक्षांशी चर्चेद्वारे सोडविण्याच्या मुद्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. भारताचा शेजारी या नात्याने नेपाळच्या सुरक्षेसाठी भारत आवश्यक ते सर्व करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

शांततापूर्ण, स्थिर, लोकशाही आणि भरभराटीनं युक्त अशा नेपाळचा उदय पाहणे ही भारताची इच्छा आहे. नेपाळच्या जनतेच्या इच्छा आणि प्राधान्यानुसार त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत, नेपाळला सर्व मदत देत राहील, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

N.Chitale/S.Tupe