पीएम्इंडिया
नेपाळचे माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भूकंपानंतर नेपाळच्या पुनर्बांधणीच्या कार्यात सहकार्य करण्यासाठी भारत कटीबध्द आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
रेंगाळलेले घटनात्मक मुद्दे सोडविण्याबाबत नेपाळने केलेल्या प्रगतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. तसेच यासंदर्भातील मुद्दे लवकरात लवकर सहकार्याने हाताळले जातील अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली.
M.Desai/S.Tupe/Vaibhavi