पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 3 जून 2026
नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष राबी लामिछाने यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने, या बैठकीबद्दल नमूद केले की,”सामायिक आणि समृद्ध भविष्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या लामिछाने यांच्या मनीषेचे पंतप्रधान स्वागत करत आहेत असून भारत त्यात पूर्णपणे सहभागी आहे” तसेच या भेटीने पंतप्रधानांना संतोष झाला असल्याचे ही त्यांनी पुढे म्हटले आहे.
‘शेजारी प्रथम’ या धोरणाप्रमाणे नेपाळ हा भारताचा एक प्रमुख सहकारी आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले. उभय देशांमधील विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी नव्या सरकारसोबत सहकार्य करण्यास भारत उत्सुक असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष राबी लामिछाने यांना भेटून मला आनंद झाला आहे. मी त्यांचे स्वागत करतो आणि सामायिक आणि समृद्ध भविष्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या त्यांच्या मनिषेला दुजोरा देतो.
आमच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणानुसार नेपाळ हा आमचा एक प्रमुख भागीदार आहे आणि उभय देशांमधील विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी नवीन सरकारसोबत सहकार्य करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
Delighted to meet the Chairman of the Rastriya Swatantra Party of Nepal Mr. Rabi Lamichhane. I welcome and fully share his desire to work closely together for a shared and prosperous future.
Nepal is a priority partner under our Neighbourhood First policy and we look forward to… pic.twitter.com/ZMjpGthKTX
— Narendra Modi (@narendramodi) June 3, 2026
राधिका अघोर/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Delighted to meet the Chairman of the Rastriya Swatantra Party of Nepal Mr. Rabi Lamichhane. I welcome and fully share his desire to work closely together for a shared and prosperous future.
— Narendra Modi (@narendramodi) June 3, 2026
Nepal is a priority partner under our Neighbourhood First policy and we look forward to… pic.twitter.com/ZMjpGthKTX
नेपालको राष्ट्रिय स्वतन्त्र पार्टीका सभापति श्री रवि लामिछानेज्यूसँग भेट्न पाउँदा अत्यन्तै खुशी लागेको छ । एक साझा र समृद्ध भविष्यका लागि मिलेर काम गर्ने वहाँको चाहनालाई म स्वागत गर्दछु र त्यसमा पूर्ण रुपमा सहमत छु ।
— Narendra Modi (@narendramodi) June 3, 2026
हाम्रो छिमेकी पहिलो नीति अन्तर्गत नेपाल प्राथमिकतामा रहेको… pic.twitter.com/5xNRbyQKTX