Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नौदलाच्या आयएनएस कलवरी या पाणबुडीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्या राष्ट्रार्पण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदलाची आयएनएस कलवरी ही पाणबुडी उद्या राष्ट्रार्पण केली जाणार आहे. मुंबईत हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

आयएनएस कलवरी ही डिझेल-इलेक्ट्रीक पाणबुडी असून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने भारतीय नौदलासाठी ती तयार केली आहे. अशाप्रकारच्या एकूण सहा पाणबुडया भारतीय नौदलात दाखल होणार असून कलवरी ही या ताफ्यातील पहिली पाणबुडी आहे. “मेक इन इंडिया”या उपक्रमाचे यशस्वी उदाहरण म्हणून या पाणबुडीकडे पाहिले जाते. फ्रेंच सहकार्यातून हा प्रकल्प साकारला आहे.

नेव्हल डॉकयार्ड येथे संरक्षण मंत्री, महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व करणारे मान्यवर आणि ज्येष्ठ नौदल अधिकाऱ्यांच्या उपस्थित पंतप्रधान ही पाणबुडी देशाला अर्पण करतील. त्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करणार असून पाणबुडीची पाहणीही करणार आहेत.

B.Gokhale/M.Pange/Anagha