पीएम्इंडिया
पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात झालेल्या दुर्दैवी अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र दुःख व्यक्त केले. या अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती पंतप्रधानांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृत व्यक्तीच्या वारसाला ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’मधून 2 लाख रुपये, तसेच, अपघातातील जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले.
‘एक्स’ वरील पोस्ट मध्ये पंतप्रधान लिहितात,
“पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात झालेल्या अपघाताची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत. जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, हीच प्रार्थना. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना ‘PMNRF’ मधून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल, तर जखमींना 50,000 रुपये देण्यात येतील: PM@narendramodi”
Deeply pained to hear about a mishap in Ferozepur district, Punjab. My condolences to those who have lost their loved ones. Wishing a speedy recovery to the injured.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be…
— PMO India (@PMOIndia) June 6, 2026
***
माधुरी पांगे/वैभवी जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]