पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या युवा हॉकीपटूंनी मिळवलेल्या शानदार यशाचे कौतुक केले. पुरुषांच्या 18 वर्षांखालील वयोगटातील आशिया चषक 2026 स्पर्धेत विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले.
मोदी यांनी नमूद केले की, संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघाने उत्कृष्ट कौशल्य आणि सांघिक समन्वयाचे प्रदर्शन केले आणि अंतिम सामन्यात संस्मरणीय विजय मिळवला. हा विजय युवकांमध्ये हॉकीची वाढती लोकप्रियताही दर्शवतो, असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. तसेच त्यांनी संघाच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी X वर लिहिले:
“आपल्या युवा हॉकीपटूंनी मिळवलेले हे एक शानदार यश आहे!
पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक 2026 स्पर्धेत विजेतेपद मिळवल्याबद्दल भारतीय हॉकी संघाचे हार्दिक अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघाने उत्कृष्ट कौशल्य आणि सांघिक समन्वयाचे प्रदर्शन केले आणि अंतिम सामन्यात संस्मरणीय विजय मिळवला. हा विजय आपल्या युवकांमध्ये हॉकीची वाढती लोकप्रियताही दर्शवितो. संघाच्या भविष्यातील वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.”
A splendid accomplishment by our young hockey players!
Congratulations to the Indian Men’s U18 Hockey Team on winning the Men’s U18 Asia Cup 2026. The team displayed exceptional skill and teamwork throughout the tournament, culminating in a memorable victory in the final. This… pic.twitter.com/w5xIVAvN13
— Narendra Modi (@narendramodi) June 6, 2026
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]