Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पामधील दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त


नवी दिल्ली, 8 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पामध्ये झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी, या दुर्घटनेत आपले आप्त गमावलेल्या कुटुंबांप्रति संवेदना व्यक्त केल्या असून, जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. स्थानिक प्रशासन, बाधितांना सर्व शक्य ती मदत पुरवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रत्येक मृताच्या जवळच्या कुटुंबियाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची मदत  दिली जाईल,असे मोदी यांनी जाहीर केले आहे.  दुर्घटनेतील जखमींना 50,000 रुपये दिले जातील, असेही पंतप्रधानांनी पुढे सांगितले.

पंतप्रधानांनी ‘X’ या समाज माध्यमावर  म्हटले आहे:

“विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पामधील दुर्घटनेमुळे अत्यंत दुःखी आहे. ज्यांनी आपले आप्त  गमावले आहेत, त्यांच्याप्रति माझ्या संवेदना. जखमी, लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन, बाधितांना सर्व शक्य ती मदत करत आहे.

प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल, तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi”

निलीमा चितळे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai