Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा उद्या नागपूर दौरा


आंबेडकर जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूरला भेट देणार आहेत.

यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विटरवरुन माहिती दिली. ‘आंबेडकर जयंतीच्या विशेष प्रसंगी उद्या नागपूरला भेट देणे, ही माझ्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे.

डॉ. आंबेडकरांशी जवळीक असणाऱ्या नागपूरमधील दीक्षा भूमीवर मी उद्या प्रार्थना करेन.

सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविणाऱ्या काही विकास प्रकल्पांचेही उद्या नागपूरात उद्‌घाटन करण्यात येईल.

या विकास प्रकल्पांमध्ये आय.आय.आय.टी., आय.आय.एम. आणि ए.आय.आय.एम.एस. यांचा समावेश असून, कोराडी औष्णिक ऊर्जा स्थानकाचेही उद्या उद्‌घाटन होईल. नागपुरात एका सार्वजनिक सभेलाही मी संबोधित करणार आहे.

डिजिधन मेळ्याच्या शिखर समारंभात लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजनेच्या मेगा ड्रॉ विजेत्यांनाही मी पुरस्कार प्रदान करेन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील सबल, समृद्ध आणि समावेशक भारत निर्माण करण्याच्या कामी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

A.P.S./M.Pange/D.Rane