Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा गुजरात दौरा


पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 जून 2017 रोजी गुजरात दौऱ्याबाबत पंतप्रधानांनी ट्विटरवरुन माहिती दिली.
“उद्यापासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहे. अहमदाबाद, राजकोट, मोदासा आणि गांधीनगर येथील कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.

माझे पहिले दोन कार्यक्रम साबरमती आश्रमात असतील. साबरमती आश्रमाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे.

साबरमती आश्रमातला दुसरा कार्यक्रम महात्मा गांधींचे गुरु श्रीमद्‌ राजचंद्रजी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आहे.
त्यानंतर मी राजकोटला जाईल. तिथे सामाजिक न्याय शिबिरात माझ्या दिव्यांग बंधुभगिनींशी मी संवाद साधेन.
अजी धरणाजवळ होणाऱ्या कार्यक्रमात मी सहभागी होईन. तिथे पाणी आणि सिंचनाशी संबंधित उपक्रमांचे मी राष्ट्रार्पण करेन.

30 तारखेला सकाळी मोदासा येथे वत्रक, माझूम आणि मेस्वो धरणांवरील पाणीपुरवठा योजनांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम असेल.

30 ला संध्याकाळी एकात्मिक क्रीडा आणि मनोरंजनाच्या अरेना प्रकल्पाचे मी उद्‌घाटन करेन.

B.Gokhale/S.Kulkarni/Anagha